Mangal Gochar 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Mangal Gochar 2024 : मंगळ ग्रहाचे धनु राशीत संक्रमण! मेषसाठी लकी तर मिथुनला प्रेमात मिळणार अपयश, वाचा १२ राशींसाठी कसे असेल नवीन वर्ष

Mangal In Kundali : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण करत असतो. अशातच वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात मंगळ ग्रहाचे धनु राशीत संक्रमण २७ डिसेंबरला झाले आहे.

कोमल दामुद्रे

Mangal Gochar In Dhanu 2023 :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण करत असतो. अशातच वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात मंगळ ग्रहाचे धनु राशीत संक्रमण २७ डिसेंबरला झाले आहे.

धनु राशीत मंगळ ग्रहाशिवाय सूर्याची युती देखील असणार आहे. त्यामुळे सूर्य, मंगळ आणि बुध यांच्या युतीमुळे त्रिग्रही योग तयार झाला आहे. मंगळ हा ग्रह युद्ध युद्ध, हिंसा आणि रक्ताचा कारक मानला जातो. त्यामुळे काही राशींनी (Rashi) सावधगिरी बाळगायला हवी. या संक्रमणाचा १२ राशींवर कसा परिणाम होणार आहे जाणून घेऊया सविस्तर

1. मेष

नवीन वर्ष तुमच्यासाठी अधिक उत्साहाचे असणार आहे. कामाच्या नवीन संधी मिळतील. बाहेर फिरण्याचे प्लान कराल. कठोर परिश्रम केल्यावर यश (Success) नक्कीच मिळेल.

2. वृषभ

प्रेमी जोडप्यांना मानसिक त्रास (Mental Stress) सहन करावा लागेल. अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. नात्यात गैरसमज होऊ शकतात. वाहन चालवताना खबरदारी घ्याल. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.

3. मिथुन

वादविवादापासून दूर राहा. कायदेशीर बाबींमध्ये अडकू नका. नवीन वर्षात जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्यावर परिणाम होईल. गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य असेल.

4. कर्क

अनेक मोठया लोकांशी नवीन वर्षात ओळख होईल. स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्यांसाठी हे वर्ष लकी ठरणार आहे. शिक्षणात यश मिळेल. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

5. सिंह

करिअरच्या प्रगतीसाठी हे वर्ष चांगले असणार आहे. व्यवसायात वाढ होईल. भावंडाचे सहकार्य लाभेल. मालमत्ता खरेदी करु शकता. मुलांची अधिक काळजी या वर्षी घ्यावी लागणार आहे.

6. कन्या

कन्या राशींच्या लोकांना या वर्षी अनेक सुख-सुविधा मिळणार आहे. धनसंपत्ती वाढ होण्याची शक्यता आहे. पालकांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

7. तुळ

या वर्षात तुम्ही अधिक उत्साही असाल. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील. कामात यश मिळेल. नवीन नोकरी मिळेल. प्रेमीयुगुलांसाठी हे वर्ष अधिक रोमँटिक असणार आहे.

8. वृश्चिक

भावा-बहिणींशी संबंध अधिक चांगले राहातील. तुमच्या शौर्यामध्ये अधिक वाढ होईल. धार्मिक कार्य कराल. कामात अधिक प्रयत्न करावे लागतील. तब्येची काळजी घ्या.

9. धनु

नवीन वर्षात आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी मिळतील. हे संक्रमण व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पाडेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

10. मकर

गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता अधिक आहे. सावधगिरी बाळगावी लागेल.

11. कुंभ

कामावर लक्ष केंद्रित केल्यास यश तुम्हाला नक्की मिळेल. मित्रांसोबत चुकीच्या गोष्टी करणे टाळा. आयुष्यात नकारात्मकतेला सामोरे जावे लागेल. संयम राखा

12. मीन

येत्या वर्षात तुम्हाला अनेक नव्या संधी मिळतील. आरोग्य चांगले राहिल. सर्व निर्णय धैर्याने घ्याल. भविष्यात तुम्हाला फायदा होईल. कामात परदेशी जाण्याची संधी मिळेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT