Dhanu Rashi 2024 : नवीन वर्षात आरोग्याकडे लक्ष द्या, प्रगतीच्या नव्या संधी मिळतील; नात्यात दूरावा येण्याची शक्यता
Sagittarius Rashibhavishya In Marathi 2024 :
धनु राशीसाठी यंदाचे वर्ष हे भाग्यशाली ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीवर गुरुचे वर्चस्व असेल. गुरु हा वृद्धी, समृद्धी,ऐश्वर्य आणि ज्ञान प्रदान करणारा ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु हा शुभ स्थानी असतो. त्याला अनेक नव्या गोष्टी शिकण्याची आवड असते.
तसेच त्या व्यक्तीला अनेक गूढ विषयांबद्दल अधिक जाणून घेण्याची आवड असते. २०२४ मध्ये ग्रहांची स्थिती पाहता कुंडलीतील लग्न भावात मंगळ आणि सूर्य विराजमान असणार आहे. त्यामुळे चांगली फले मिळतील. जाणून घेऊया कसे असेल धनु राशीसाठी (Rashi) नवीन वर्ष.
करिअरच्या (Career) दृष्टीने यंदाचे वर्ष धनु राशीसाठी अधिक चांगले ठरणार आहे. नोकरी आणि व्यापारात लाभ मिळेल. कामात प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी अधिक धावपळ होईल. लांबचे प्रवास होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात नोकरी देखील बदलू शकतात.
आर्थिक स्थितीच्या बाबतीत हे वर्ष अधिक नफ्याचे ठरणार आहे. पैसे (Money) येण्याचे अनेक नवे मार्ग खुले होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. धनप्राप्तीच्या दृष्टीने हे वर्ष चांगले राहिल. मनोरंजन आणि प्रवासात वेळ घालवाल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
वैवाहिक जीवनासाठी यंदाचे वर्ष थोडे कठीण असू शकते. लवकरच गोड बातमी मिळेल. अनेक छोट्या छोट्या गोष्टींवरुन नात्यात वाद होतील. नात्यात दूरावा येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे.
धनु राशींच्या लोकांना शिक्षणाच्या बाबतीत हे वर्ष अधिक चांगले जाईल. अभ्यासात मन लागेल. मुलांकडून चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

