Gambling Saam Tv
लाईफस्टाईल

Gambling: जुगारात 40 कोटी गमावले, मग थेट कसिनोवरच पलटवार, म्हणाला-मला जुगार का खेळू दिला?

चोराच्या उलट्या बोंबा ही म्हण आपण ऐकलीच असेल. मलेशियात याच म्हणीचं उदाहरण पाहायला मिळालं आहे.

वृत्तसंस्था

मुंबई : चोराच्या उलट्या बोंबा ही म्हण आपण ऐकलीच असेल. मलेशियात याच म्हणीचं उदाहरण पाहायला मिळालं आहे. येथे राहणाऱ्या एका श्रीमंत व्यावसायिकाने कसिनोविरोधात खटला दाखल केला. लंडनमधील कसिनोमध्ये या व्यावसायिकाने 40 कोटी रुपये जुगारात गमावले. मात्र, या पराभवासाठी त्यांनी स्वत:ऐवजी कसिनोला जबाबदार धरले. या व्यक्तीने त्याच्या नुकसानासाठी कॅसिनोला जबाबदार धरले आणि त्याच्यावर खटला दाखल केला (Malaysian Business Tycoon lost 40 crore rs in gambling sues the casino).

लिम हान जोह असे या मलेशियन (Malaysia) व्यावसायिकाचे नाव आहे. 2015 मध्ये लिम लंडनला (London) बिझनेस ट्रिपवर गेले होते. तेथील एका कसिनोमध्ये लिम हे 40 कोटी हरले. जेव्हा लिमने सर्व पैसे गमावले (Business Tycoon Lost 40 Crore In Gambling) तेव्हा त्यांनी कसिनोवर पलटवार केला. कसिनोविरुद्ध खटला मांडताना ते म्हणाले की, कसिनो मालकाच्या चुकीमुळे त्याला पैसे गमवावे लागले. जेव्हा कसिनोमध्ये काम करणाऱ्याने त्याला पाहिले तेव्हा त्याने त्यांना का थांबवलं नाही? कसिनोने मला जुगार खेळण्यापासून थांबवायला हवे होते, असे लिम म्हणतात. 2015 च्या या घटनेबाबत त्यांनी कसिनोवर खटला (Sues Casino) दाखल केला आहे.

उद्योगपती लिम हे मलेशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. लिमची मलेशिया आणि लंडनमध्ये मालमत्ता आहे. डेली मेलच्या बातमीनुसार, लिमची एकूण संपत्ती 4 अब्ज रुपयांच्या जवळपास आहे. 2014 मध्ये तो लंडनमधील एका खासगी कसिनोमध्ये जॉईन झाला होता. यामध्ये लिमने पैसे गमावले. या कसिनोमध्ये लिमने सर्व पैसे गमावले. 2015 पासून सुरु असलेल्या या खटल्यात अखेर कसिनोने खटला जिंकला.

लिमने जुगार कायदा 2005 अन्वये कसिनोवर गुन्हा दाखल केला, की प्रसिद्ध लोकांना जुगार खेळण्यापासून थांबवायला पाहिजे. लिमच्या मते, कसिनोने त्याला जुगार खेळण्यापासून थांबवायला हवे होते. त्याने कसिनोवर लालूच दाखवून त्याला पुन्हा पुन्हा जुगार खेळण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला. या लालसेपोटी लिम पुन्हा पुन्हा जुगार खेळत राहिला आणि त्याचे 40 कोटींचे नुकसान झाले.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 1st T20I: नाद करा पण आमचा कुठं! वर्ल्ड चॅम्पियन भारताचा दक्षिण आफ्रिकेला दणका

Supriya Sule Speech : पोर्शे कार अपघात प्रकरणात बदनामी केल्यामुळे शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंचा भरसभेत गौप्यस्फोट

6,6,6,6,6...द.आफ्रिकेत Sanju Samsonचं वादळ! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेत संजू सॅमसन शो.. दमदार अर्धशतकासह मोडला मोठा रेकॉर्ड

Raj Thackeray Speech : सूरत-गुवाहाटी, पहाटेचा शपथविधी, शिवसेना; राज ठाकरेंची एकाच सभेत ठाकरे, पवार, शिंदे, फडणवीसांवर तोफ

SCROLL FOR NEXT