Mistake to avoid post dinner saam tv
लाईफस्टाईल

Mistake after dinner: रात्रीच्या जेवणानंतर तुमची ही चूक आरोग्यासाठी पडेल महागात; तुम्ही तर ही चूक करत नाही ना?

Mistake to avoid post dinner: अनेक लोक जेवणानंतर काही सवयी अंगीकारतात ज्या साध्या वाटतात, पण आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. डॉक्टरांच्या मते, या सवयींमुळे पचन बिघडते आणि दीर्घकालीन आजारांचा धोका वाढतो.

Surabhi Jayashree Jagdish

थंडीच्या दिवसात रात्री मस्त चादर ओढून झोपण्याचा आनंद काही वेगळाच आहे. मात्र अनेकदा झोपताना जळजळ, पोटात जडपणा वाटणं किंवा एसिडीटी असा त्रास होतो. तेलकट खाणं, जंक फूड या गोष्टींमुळे त्रास होत असेल असं म्हणून आपण मोकळे होते. परंतु यामागे खरं कारण काही वेगळंच असतं. डॉक्टरांच्या मतानुसार, आपण काय खातोय यामध्ये चूक नसून आपण खाल्ल्यानंतर काय गोष्टी करतो त्या चुकीच्या असू शकतात.

जेवल्यानंतर अन्न पोटात गेल्यानंतर शरीर ते पचवण्याच्या प्रक्रियेकडे वळतं. अशावेळी आपण त्याला वेळ न देता थेट बेडवर जाऊन आराम करायचा विचार करतो. जेवणानंतर बेडवर आराम करणं हे पचनतंत्रासाठी मोठा झटका मानला जातो. जेव्हा तुम्ही कोणतीही शारीरिक हालचाल न करता थेट झोपी जातो तेव्हा शरीराचं मेटाबॉलिझ्म सुस्त होतं आणि जेवाणाचं योग्य प्रकारे पचन होत नाही.

लाईव्ह हिंदुस्तानला माहिती देताना मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे गॅस्ट्रोइन्ट्रोलॉजीस्ट डॉ. संजय कुमार यांनी सांगितलं की, आजकाल धावपळीच्या जगात रात्रीचं जेवण उरकायला १०-११ वाजतात. दिवसभर थकल्यानंतर आपण पोटभर जेवतो, मात्र आपलं पुढचं काम हे मोबाईलची स्क्रिन स्क्रोल करणं किंवा झोपणं असतं. परंतु हा आपल्या पचनतंत्रावर सायलेंट वॉर असतो.

ज्यावेळी आपण भरपेट जेवण करून बेडवर लोळतो तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या अभावाने पोटात एसिड वर येतं म्हणजेच अन्ननलिकेकडे येऊ लगातं. यामुळे आंबट ढेकर येणं, छातीत जळजळ होणं आणि पोट जड वाटणं अशा समस्या त्रास देऊ लागतात, असंही डॉ. संजय यांनी सांगितलं.

जेवल्यानंतर लगेच झोपल्यास काय त्रास होतो?

पचनतंत्रावर परिणाम

जेवून लगेच झोपल्यानंतर हार्टबर्न,एसिड रिफ्लक्स, अपचन किंवा छातीत जळजळ असे त्रास होऊ लागतात. अनेक लोकं याला साधी एसिडीटी समजून दुर्लक्ष करतात. मात्र ही सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते.

नैसर्गिक संतुलन बिघडतं

आपल्या पूर्वजांनी वज्रासनात बसण्याचा किंवा जेवणानंतर थोडं चालण्याचा सल्ला का दिला याचा तुम्ही कधी विचार केलाय का? हे अंधश्रद्धेवर आधारित नाही तर गुरुत्वाकर्षणाच्या शास्त्रावर आधारित आहे. आपली पचनसंस्था सरळ पाईपसारखी कार्य करते.

जेव्हा आपण सरळ बसतो किंवा उभं राहतो तेव्हा ही पृथ्वीची शक्ती नैसर्गिकरित्या अन्न आणि पचन आम्लांना खाली दाबते, ज्यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत होते. जर तुम्ही जेवल्यानंतर लगेच आडवे झोपलात तर हे नैसर्गिक संतुलन बिघडतं. झोपल्याने पोटातील आम्ल वरच्या दिशेकडे येतं ज्यामुळे छातीत जळजळ होते.

GERD च्या समस्या वाढतात

रात्री ९-१० वाजता जेवल्यानंतर लगेच झोपणं हे पाचनतंत्रासाठी हानिकारक आहे. या सवयीमुळे पोटात जडपणा वाटणं, गॅस, ब्लोटींग किंवा झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.

या छोट्या बदलांमुळे समस्येपासून आराम मिळेल

  • झोपण्यापूर्वी किमान २-३ तास ​​आधी जेवण करा.

  • जेवणानंतर पायी चालणं किंवा १०-१५ मिनिटं उभं राहणं पचनासाठी उपयुक्त आहे.

  • रात्री जास्त तेलकट, मसालेदार अन्नपदार्थ खाणं टाळा.

  • थोडी उंच उशी घेऊन झोपल्याने अ‍ॅसिड रिफ्लक्सची समस्या कमी होऊ शकते.

  • जर तुम्हाला वारंवार छातीत जळजळ, ढेकर येणं किंवा गिळण्यास त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Palika Election Result Live: वाशिमच्या कारंजा नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदावर एमआयएमचा झेंडा

Konkan Politics: कोकणात भाजपला हादरा, कणकवलीच्या नगराध्यपदी पारकर

Shubman Gill: शुभमन गिलच्या नावावर का बसली कात्री? रिपोर्टमधून सत्य कारण अखेर समोर

बांगलादेश पुन्हा पेटलं; जमावाने नेत्याचं घर पेटवलं, ७ वर्षांच्या मुलीचा होरपळून मृत्यू

Hair Care: केस ड्राय होऊन गळतायतं? मग पार्लर ट्रिंटमेंटपेक्षा घरीचं करा 'हा' हेअस मास्क, एका वॉशमध्येच दिसेल फरक

SCROLL FOR NEXT