Heart Health Saam TV
लाईफस्टाईल

Heart health: 90 दिवसात तुमचं हृदय बनेल मजबूत; डॉक्टरांनी सांगितल्या ५ सोप्या टीप्स

Cardiovascular health: हृदय आरोग्य सुधारण्यासाठी डॉक्टरांनी 90 दिवसांची सोपी योजना सांगितली आहे. योग्य आहार, व्यायाम, झोप आणि सूज नियंत्रणामुळे हृदय मजबूत राहते. शरीरातील मूळ कारण शोधणे आणि जीवनशैली बदलणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Surabhi Jayashree Jagdish

हृदयाचे आरोग्य हे आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी थेट जोडलेलं असतं. पण बरेच लोक हृदयाची काळजी फक्त समस्या निर्माण झाल्यानंतर घ्यायला लागतात. उच्च रक्तदाब, शरीरातील सूज (inflammation), तणावपूर्ण जीवनशैली अशा अनेक गोष्टी हळूहळू हृदयावर परिणाम करत जातात. सुरुवातीला हे त्रास जाणवत नाहीत पण दीर्घकाळात ते गंभीर आजारांचे कारण बनू शकतात. म्हणूनच आहार, व्यायाम, झोप आणि रोजच्या सवयी यामध्ये योग्य बदल करून हृदयाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे.

हृदयविकार तज्ज्ञ आणि फंक्शनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. संजय भोजराज यांनी सांगितलं की, योग्य पद्धतीने आणि सातत्याने केलेले बदल फक्त 90 दिवसांत हृदयाचं आरोग्य सुधारू शकतात. त्यांनी इन्स्टाग्रामवरील एका व्हिडिओमध्ये काही सोप्या पण प्रभावी टिप्स शेअर केल्या आहेत. त्यांच्या मते, उपचार सुरू करण्यापूर्वी शरीरातील मूळ कारण शोधणं आणि त्यावर काम करणं सर्वात गरजेचं आहे.

हृदय सुधारण्यासाठी उपयुक्त उपाय

डॉ. भोजराज यांच्या मते रोज एक चमचा कोल्ड-प्रेस्ड ब्लॅक सीड ऑईल (काळ्या जिऱ्याचे तेल) घ्यावं. हे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतं. आहारामध्ये पोटॅशियमयुक्त पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. कारण बरेच लोक दररोज सुमारे 1000mg पोटॅशियम कमी घेतात. योग्य प्रमाणातील पोटॅशियममुळे रक्तदाब नैसर्गिकरीत्या नियंत्रणात राहतो.

त्यांनी दररोज किमान 30 मिनिटं शारीरिक हालचाल करण्याचा सल्ला दिलाय. यामध्ये योग, चालणं किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग यांचा समावेश असू शकतो. तसंच रोज रात्री किमान 7.5 तास झोप घेणं आणि सकाळी काही वेळ श्वसनाचे व्यायाम करणं देखील हृदयासाठी फायदेशीर असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय.

मूळ कारण समजून घेणं सर्वात महत्त्वाचं

डॉ. भोजराज यांनी स्पष्टपणे सांगतात की, “हृदय बरं करण्याची सुरुवात ही शरीरात खरोखर काय नुकसान घडवतंय हे समजून घेण्यापासून होते.” त्यांच्या मते, फक्त मीठ कमी करणं, रोज व्यायाम करणं किंवा कोलेस्ट्रॉलची औषधं घेणं इतकेच पुरेसं नाही.

डॉक्टरांनी असंही सांगितलंय की, असंही सांगतात की जवळपास 68% लोकांच्या रिपोर्ट्स सामान्य दिसतात, तरीही त्यांच्या शरीरात लपलेली सूज हृदयाला आतून नुकसान करत असतं. चुकीच्या प्रकारचे मॅग्नेशियम घेतल्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयासाठी चांगलं मानले जाणारे काही सीरिअल्सही रक्तातील साखर आणि इन्सुलिन वाढवू शकतात. इन्सुलिन रेसिस्टन्स हे हार्ट अटॅकचं एक मोठं कारण असल्याचं ते सांगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT