Weight Loss: १० दिवसांत करा ४ किलोपर्यंत वजन कमी; जाणून घ्या दिवसभर काय खावे आणि काय करावे?

Shruti Vilas Kadam

दिवसाची सुरुवात कोमट पाणी आणि लिंबूपाण्याने करा

सकाळी उठल्यानंतर १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

Weight Loss | pinterest

नाश्त्यात प्रथिनेयुक्त पदार्थ खा

नाश्त्यासाठी उकडलेली अंडी, मूग चिल्ला, ओट्स, दही किंवा मोड आलेले कडधान्ये खा. यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि भूक कमी लागते.

Weight Loss | pinterest

साखर आणि मैद्याचे पदार्थ टाळा

केक, बिस्किटे, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस, पांढरा ब्रेड आणि तळलेले पदार्थ शक्यतो टाळा. हे पदार्थ वजन वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात.

Weight Loss | pinterest

दुपारच्या जेवणात संतुलित आहार घ्या

२ चपात्या किंवा भाकरी, भरपूर भाजी, डाळ आणि सॅलडचा समावेश करा. ताटातील अर्धा भाग भाज्यांनी भरल्यास कॅलरीचे प्रमाण कमी राहते.

Weight Loss | pinterest

रोज किमान ४५ ते ६० मिनिटे चालणे किंवा व्यायाम करा

वेगाने चालणे, सायकलिंग, जॉगिंग किंवा कार्डिओ व्यायाम केल्याने अतिरिक्त कॅलरी बर्न होण्यास मदत होते.

Weight Loss | pinterest

संध्याकाळी आणि रात्री हलका आहार घ्या

फळे, सूप, सॅलड किंवा हलके पदार्थ चणे शेंगदाणे खा. रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान २ ते ३ तास आधी पूर्ण करा.

Weight Loss | pinterest

पुरेशी झोप आणि भरपूर पाणी प्या

दररोज ७ ते ८ तास झोप घ्या आणि २.५ ते ३ लिटर पाणी प्या. योग्य झोप आणि हायड्रेशन वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला मदत करतात.

Weight Loss Tips | pinterest

दिवसभराचा साधा आहार प्लॅन

सकाळी: कोमट पाणी + लिंबू, नाश्ता: कडधान्ये/ओट्स/अंडी, मधल्या वेळेत: फळे किंवा नारळपाणी, दुपारचे जेवण: चपाती, भाजी, डाळ, सॅलड , संध्याकाळी: ग्रीन टी किंवा भाजलेले चणे, रात्री: सूप, सॅलड किंवा हलका प्रथिनेयुक्त आहार

Weight Loss | pinterest

Amla Benefits: २१ दिवस रोज एक आवळा खाल्ल्याने शरीरात होताता हे ७ आरोग्यदायी फायदे

Amla Benefits | GOOGLE
येथे क्लिक करा