Fathers Day Trip Saam TV
लाईफस्टाईल

Fathers Day Trip : दमलेल्या बापासाठी लेक नारळातलं पाणी; फादर्स डे निमित्त बाबांसोबत 'या' ठिकाणी नक्की भेट द्या

Trip Plan For Fathers Day : या फादर्स डेला तुमच्या बाबांना बाहेर फिरण्यासाठी घेऊन जाऊ शकता. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही ट्रिप प्लान केले आहेत.

Ruchika Jadhav

आपण लहान असताना बाबा आपल्याला विविध ठिकाणी फिरायला न्यायचे. मात्र आता आपण मोठे झालो आहोत आणि बाबा म्हतारे झालेत. त्यामुळे तुम्ही या फादर्स डेला तुमच्या बाबांना बाहेर फिरण्यासाठी घेऊन जाऊ शकता. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही ट्रिप प्लान केले आहेत.

गावातली शाळा

प्रत्येक व्यक्तीला आपलं बालपण आपली शाळा फार प्रिय असते. आपण १० वी पर्यंत जिथे शिक्षण घेतलं ती जागा व्यक्ती कधीच विसरत नाही. त्यामुळे बाबांना फिरायला न्यायचं असेल तर तुम्ही त्यांना त्यांच्या जुन्या शाळेजवळ घेऊन जा. याने त्यांच्या मनाला फार समाधान लाभेल.

गावचं घर

जुन्या माणसांना आजही आपल्या गावाची आणि गावातील घराची फार आठवण येते. मुंबईमधील झगमगीत आणि सर्व सोयीसुवीधा असलेल्या शहरात देखील ते गावातील शांतता शोधत असतात.

डॉमिनोज

जर तुम्हाला लांब गावी जाणं शक्य नसेल तर बाबांना घेऊन तुम्ही डॉमिनोज, पिझ्झाहट अशा ठिकाणी सुद्धा जाऊ शकता. कारण प्रत्येक वडिल पैशांनी कितीही श्रिमंत असला तरी स्वत:हून अशा महागड्या कॅफेमध्ये जात नाही. त्यामुळे फादर्स डे निमित्त तुमच्या बाबांना तुम्ही येथे आणू शकता.

तलाव

प्रत्येक शहरात एक तलाव किंवा सुंदर गार्डन तर असतंच तर यावेळी फादर्स डे निमित्त तुम्ही बाबांना घेऊन तलावाजवळ जाऊ शकता. शांतता आणि तरळणारं पाणी पाहून बाबांना तुम्ही दिलेलं सरप्राइज फार आवडेल.

पार्टी

तुम्हाला तुमच्या पप्पांना बाहेर फिरालयला नेता येत नसेल तर घरच्या घरी त्यांच्यासाठी जंगी पार्टीचं आयोजन करा. त्यासाठी त्यांच्या सर्व मित्रांना घरी आमंत्रण द्या.सर्वासोबत एकत्र फादर्स डे निमित्त केक कट करा. अशा छोट्या-मोठ्या गोष्टींमधून सुद्धा तुम्हाला आनंद व्यक्त करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijeet Dipke : 'माझ्या अटकेची तयारी सुरू'; मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन अभिजीत दिपकेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Rain Alert: पुणे, सोलापूरसह १० जिल्ह्यांत तुफान पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

SIR वरून वाद सुरू असतानाच आयोगाचा मोठा निर्णय; १७ राज्यांसाठी नवे आदेश

Today Horoscope : 'या' ६ राशींची होईल भरभराट; देवीच्या कृपेने मिळेल यश; वाचा शुक्रवारचे राशिभविष्य

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

SCROLL FOR NEXT