ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्याच्या तरुणांमध्ये सोलो ट्रीपला जाण्याचे प्रमाण अधिक दिसून येते.
तुम्ही कधी लग्नानंतर सोलो ट्रीपला गेला आहात का?
मात्र लग्नानंतर सोलो ट्रीपला जाण्याचे अनेक फायदे आहेत, जाणून घेऊयात त्या विषयी.
लग्नानंतर दोघं घरात सोबत राहतात,त्यामुळे अनेक खटके उडतात त्यामुळे अनेकदा एकमेकांपासून लांब गेल्यावर नात्याचे महत्त्व समजत असते,त्यामुळे लग्नानंतर सोलो ट्रीप एकदा करावी.
सोलो ट्रीप केल्याने आपल्या कुंटुबा व्यतिरीक्त आपल्याला अनेकांशी संवाद साधता येतो. अनेक नवीन विचार आत्मसात करता येतात.
लग्नानंतर जोडीदार एकमेंकावर अवलंबून असतात मात्र तुम्ही सोलो ट्रीपला जाता तेव्हा तुम्ही एका कम्फर्ट झोनच्या बाहेर जाता हे तुमच्यासाठी चांगेल ठरु शकते.
लग्नानंतर जास्त आपण जोडीदाराचा विचार करतो मात्र सोलो ट्रीपला गेल्यानंतर आपल्याला आपल्या मनासारखे जगता येते.
अनेकदा लग्नानंतर बंधने निर्माण होतात, त्यामुळे आपली बाजू मांडता येत नाही,अशात तुम्ही सोलो ट्रीपला गेल्यास तुम्ही त्या ठिकाणी जाऊन मनातल्या गोष्टी इतरांशी बोलू शकता.