Tawa Pizza Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Tawa Pizza Recipe : देस्सी स्टाइलमध्ये बनवा तवा पिझ्झा; मिनिटांत होईल तयार, पाहा रेसिपी

Food : बाजारात मिळणारा पिझ्झा तुम्ही अनेकदा खाल्ला असेल,घरी देखील तुम्ही पिझ्झा बनवला असेल.

कोमल दामुद्रे

Desi Pizza Recipe : पिझ्झा हे इटालियन फूड असले तरी आपल्या देशातही खूप लोकप्रिय आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच पिझ्झा खायला आवडतो. बाजारात मिळणारा पिझ्झा तुम्ही अनेकदा खाल्ला असेल,घरी देखील तुम्ही पिझ्झा बनवला असेल.

पण आज आम्ही या रेसिपी मध्ये पिझ्झालाही देसी तडका लावला आहे.खूप चविष्ट अशी ही तवा पिझ्झा रेसिपी आहे. प्रत्येकाला याची चव आवडेल आणि हा तवा पिझ्झा बनायला जास्त वेळही लागत नाही त्यामुळे दिवसभरातून थोडीफार जरी भूक लागली तेव्हा तुम्ही सहज ही रेसिपी बनवू शकता चला तर मग जाणून घेऊया तेव्हा पिझ्झा (Pizza) बनवण्याची पद्धत काय आहे?

1. पिझ्झा सॉससाठी साहित्य

  • कांदा बारीक चिरलेला – १/२ कप

  • लसूण चिरलेला – १ टीस्पून

  • टोमॅटो (Tomato) – ६/७

  • ओरेगॅनो – १/२ टीस्पून

  • रेड चिली फ्लेक्स – १ टीस्पून

  • मिरची पावडर – १ टीस्पून

  • मीठ – चवीनुसार

  • साखर (Sugar) – १/२टीस्पून

  • टोमॅटो केचप – २ टीस्पून

2. देसी स्टाईल पिझ्झासाठी साहित्य

  • पातळ पिझ्झा बेस – २

  • पिझ्झा सॉस – १/२ कप

  • किसलेला मोझरेला चीज – १ कप

  • कांद्याचे काप – १/२ कप

  • शिमला मिरचीचे तुकडे – १/२ कप

  • ड्राय ओरेगॅनो – शिंपडण्यासाठी

  • सुकी लाल मिरची – शिंपडण्यासाठी

  • बटर – १/२ टीस्पून

  • ऑलिव्ह ऑइल – २ टीस्पून

Tawa Pizza Recipe

तवा पिझ्झा बनवण्याची रेसिपी

1. पिझ्झा सॉस कृती :

  • त्यासाठी टोमॅटोच्या वरच्या थरावर क्रॉस बनवा आणि त्याला भांड्यात उकळण्यासाठी ठेवा.

  • टोमॅटोचा वरचा थर बाहेर येईपर्यंत शिजवायचे आहे. त्यानंतर टोमॅटो थंड झाल्यावर त्याची वरची साल काढून घ्या.

  • आता टोमॅटोचे मोठे तुकडे करून मिक्सरमध्ये गुळगुळीत पेस्ट करून घ्या आता ही पेस्ट एका भांड्यात काढून बाजूला ठेवा.

  • त्यानंतर एका नॉनस्टिक पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण आणि कांदा घालून परतून घ्या

  • एक-दोन मिनिटे झाल्यानंतर त्यात टोमॅटो पेस्ट, ओरेगॅनो, तिखट, ड्राय चिली फ्लेक्स ,टोमॅटो केचप आणि चवीनुसार मीठ घाला.

  • आता हे मिश्रण दोन-तीन मिनिटे शिजत असताना मिश्रण ढवळत राहा. त्यानंतर यात साखर घाला आणि पुन्हा दोन मिनिटे शिजवा.त्यानंतर तयार आहे पिझ्झा सॉस.

2. देसी स्टाइल पिझ्झा बनवण्याची कृती :

  • आता देसी स्टाइल पिझ्झा बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पिझ्झा बेस घेऊन त्यावर पिझ्झा सॉस टाका आणि सर्व बाजूंनी समान पसरून घ्या.

  • आता त्यावर शिमला मिरची आणि कांद्याचे काप पसरून घ्या.

  • त्यानंतर त्यावर किसलेला चीज टाकून लाल मिरचीचे फ्लेक्स आणि कोरडे ओरेगॅनो शिंपडा.

  • आता एका नॉनस्टिक पॅन वर थोडे बटर पसरून गरम करून घ्या.बटर वितळल्यानंतर पिझ्झा तव्यावर ठेवा आणि त्यावर एक झाकण ठेवा.

  • पिझ्झाच्या वरचे चीज पूर्णपणे वितळेपर्यंत ते शिजवून घ्या.

  • पिझ्झा शिजत असताना त्याला मध्ये मध्ये तपासत रहा.

  • यानंतर पिझ्झा एका प्लेटमध्ये काढून याचप्रमाणे दुसऱ्या बेसमधूनही पिझ्झा तयार करा अशाप्रकारे तयार आहे चविष्ट तवा पिझ्झा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

Maharashtra Water Dam : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, राज्यातील प्रमुख धरणं तुडुंब भरली; पाणीटंचाईचा प्रश्न सुटला

Coolie VS War 2: रविवारी 'कुली'चा बोलबाला, 'वॉर २'ला पछाडले; चौथ्या दिवशी केलं इतक्या कोटींचं कलेक्शन

SCROLL FOR NEXT