Pickle Recipe SAAM TV
लाईफस्टाईल

Bitter Gourd Pickle : कडू कारल्यापासून बनवा आंबट गोड लोणचं; रेसिपी नक्की ट्राय करून बघा, बोट चाटत रहाल

Pickle Recipe : कारल्याचं नाव काढलं की बरेच लोक नाक मुरडतात. मात्र आज आपण याच कारल्यापासून चटपटीत जेवताना तोंडी लावण्यासाठी लोणचं बनवायला शिकणार आहोत. पटकन रेसिपी नोट करा.

Shreya Maskar

कारल्याची भाजी खायला अनेकांना नाही आवडत. कारण त्यातील कडूपणा किती झाला तरी तोंडात येतोच. पण आपण हाच कडूपणा दूर करून कारल्याचा नवीन प्रकारे आस्वाद घेऊ शकतो. कारल्याचा कडूपणा घालवण्यासाठी तुम्ही चटपटीत कारल्याचं लोणचं बनवू शकतो. तुमच्या घरातील लोक हे लोणचं आवडीने खातील. जेवताना तोंडी लावण्यासाठी हा उत्तम पदार्थ आहे. कारल्यातील पोषक तत्व शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. तसेच कारल्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

घरी झटपट कारल्याचं लोणचं बनवण्यासाठी रेसिपी जाणून घ्या.

कारल्याचं लोणचं

साहित्य

  • कारले

  • मोहरीचे तेल

  • मेथीचे दाणे

  • मोहरी

  • जिरे-धणे पावडर

  • हळद

  • तिखट-मीठ

  • हिंग

  • मीठ

  • लिंबाचा रस

  • हिरवी मिरची

कृती

कारल्याचं लोणचं तयार करण्यासाठी सर्वप्रथम कारल्यातील बिया काढून करल्याच्या बारीक फोडी करून घ्या. आता लोणच्याचा मसाला तयार करण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यामध्ये मेथीचे दाणे, मोहरी, जिरे-धणे घालून छान परतून घ्या. हे भाजलेले मसाले थंड झाल्या‌वर मिक्सरमध्ये वाटून घ्या. आता एका बाऊलमध्ये कारल्याच्या फोडी, मीठ, हळद, तिखट, हिंग, लिंबाचा रस आणि सर्व मसाले घालून चांगले एकजीव करून घ्या. लोणच्याची चव आणखी वाढवण्यासाठी त्यामध्ये गूळ घाला. यामुळे लोणच्याला आंबट गोडपणा येईल. आता हे बनवलेले लोणचे एका काचेच्या बरणीत ठेवून ३ ते ४ दिवस सूर्यप्रकाशात ठेवा. काही दिवसानंतर गरमागरम पोळी सोबत याचा आस्वाद घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

पवार-ठाकरेंना हवी मनसे? काँग्रेसला राज ठाकरे नकोसे?

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शिंदेसेनेनं दिला धक्का

SCROLL FOR NEXT