कालच देशभरात स्वातंत्र्यदिन पार पडला आहे. स्वातंत्र्यदिन आणि लागोपाठ सुट्ट्या आल्याने प्रत्येकजण पिकनिकचे प्लान करत आहेत. कारण गेल्या २ ते ३ दिवसांपासून लॉंग विकेंड सुरु झाला आहे. अनेकांना सुट्ट्या आहेत तर काही व्यक्ती सुट्टी घेत आहे. तुम्ही सुद्धा येणाऱ्या शनिवार,रविवार आणि सोमवारची रक्षाबंधनची सुट्टी,अशा तीन दिवसाच्या सुट्ट्या घेऊन तुमच्या जोडीदारासोबत प्लान करा फिरायला जायचा. तुम्ही जोडीदारासोबत वीकेंडसाठी बेस्ट डेस्टिनेशन शोधत आहात तर, महाराष्ट्रातील या प्रसिद्ध ठिकाणांना नक्की भेट द्या.
माथेरान- जर तुम्ही मुंबई आणि मुंबईजवळच्या परिसरात वास्तव्यास असाल तर अगदी काही तासाभराच्या अंतरावर अतिशय सुंदर असे माथेरान हे पर्यटन स्थळ आहे. दरदिवशी हजारो पर्यटक कुटुंबासह तर तुम्ही येथे जाऊ शकता शिवाय जोडीदारासोबत येथे फिरण्यासाठी जाऊ शकतात.माथेरान या ठिकाणाली महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर (Mahabaleshwar)म्हणून देखील ओळखले जाते.
अलिबाग- मुंबईपासून काही अंतरावर असलेले अलिबाग या ठिकाणी तुम्ही विकेंडसाठी प्लान करु शकता. महाराष्ट्र राज्यातील हे ठिकाण अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन (Tourism) स्थळ म्हणून ओळखले जाते. येत्या विकेंडसाठी हे ठिकाण अतिशय बेस्ट ठरेल.
इगतपुरी- जर जोडीदारासोबत विकेंड प्लान करत असाल तर इगतपुरी हे ठिकाणही अतिशय बेस्ट ठरेल. पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात अनेक कुटुंब शिवाय अनेक मित्रमंडळी या ठिकाणी येत असतात. इगतपुरी हे ठिकाण पावसाळ्यात अतिशय मनमोहक दिसून येते शिवाय सोबत छोटे-मोठे धबधबे याला अजूनच सौदर्यं लाभते.
माळशेज घाट - जर तुम्ही या विकेंडला बाहेर पडत असाल तर माळशेज घाटावर नक्की जायला हवे.सध्या लॉंग विकेंड असल्याने माळशेज घाटात पर्यटकांची मोठी गर्दी(crowd) पाहायला मिळते. या ठिकाणी भल्या मोठ्या डोंगरावरुन जमिनीवर कोसळणाऱ्या धबधब्याचे सौंदर्य काही अप्रतिम असे दिसते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.