Makhana Khichdi Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Makhana Khichdi Recipe : उपवासासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी अशी मखाना खिचडी

तुम्हाला मखना खिचडी माहित आहे का?

कोमल दामुद्रे

Makhana Khichdi Recipe : आपल्या भारतात खिचडीला शुभ पदार्थ मानला जातो. खिचडी ही भारताच्या पारंपारिक खाद्यपदार्थांपैकी एक आहे. तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारच्या खिचड्या खाल्ल्या असतील. पण तुम्हाला मखना खिचडी माहित आहे का? आज आम्ही मखाना खिचडीची रेसिपी सांगणार आहोत.

मखाना हे एक प्रकारचं ड्रायफ्रूट आहे. ज्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. मखना या ड्रायफ्रूटमध्ये भरपूर चांगले गुणधर्म असतात. मखाण्याच्या सेवनाने अनेक प्रकारचे आजार (Disease) दूर होतात. मखाना खिचडी ही तुम्ही उपवासाच्या वेळी देखील खाऊ शकता. त्याचबरोबर थंडीच्या दिवसांमध्ये तुम्हाला हेल्दी डायट (Diet) खायचं असेल तर तुम्ही मखानाचं सेवन सुरू करायला हवं. मखाना खिचडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे ही खिचडी पचनासाठी फायदेशीर असते. चला तर मग पाहूया आता मखाना खिचडीची रेसिपी.

साहित्य.

1. दोन वाटी मखणा

2. दोन हिरव्या मिरच्या

3. एक बटाटा (Potatoes)

4. कोथिंबीर

5. १/४ टीस्पून काळीमिरी पूड

6. तूप

7. लिंबाचा रस

8. चवीनुसार मीठ

Makhana Khichdi Recipe

कृती :

  • सर्वप्रथम एक बटाटा, एक हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक बारीक कापून घ्या.

  • त्यानंतर मखाना घेऊन त्याचे छोटे छोटे तुकडे करा.

  • त्यानंतर प्रेशर कुकर मध्ये एक चमचा तूप टाकून गॅस वाढवून तूप चांगलं गरम करा.

  • तूप चांगलं गरम झाल्यावरती गॅसची फ्लेम मिडीयम करा.

  • त्यानंतर तुपामध्ये बारीक कापलेले बटाट्याचे हिरवी मिरची टाकून थोड्या वेळ परता. त्यानंतर प्रेशर कुकरमध्ये मखाना टाकून मिक्स करा.

  • त्यानंतर कुकरमध्ये काळीमिरी पूड आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा. त्यानंतर कुकर मध्ये अर्धा कप पाणी टाकून कुकर चे झाकण लावून घ्या.

  • चार ते पाच शिट्टी येईपर्यंत शिजवून घ्या.

  • आता गॅस बंद करा आणि प्रेशर कुकर थंड होण्याची वाट बघा.

  • कुकर थंड झाल्यावर त्याचा झाकण खोलून मखाना खिचडी एका भांड्यामध्ये काढून घ्या.

  • त्यानंतर खिचडी वर लिंबूचा रस पिळून हिरवी कोथिंबीर कापून गार्निश करा. त्याचबरोबर मखाना खिचडीला प्रेशर कुकर सोबत कढईमध्ये देखील बनवले जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT