Rava Veg Tikki Recipe : थंडीत सतत काहीतरी खाण्याची इच्छा होते अश्यात रोज नाश्ट्यात एकच पदार्थ खाऊन बोर झाला असले आणि काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा असेल तर आपण नवीन नवीन प्रकर घरी (Home) बनवून बघत असतो पण रोज काय नवीन बनवायचे? हा प्रश्न सोडवण्यााठी आम्ही तुमच्या एक रेसीपी घेऊन आलो आहोत.
रवा चा वापर करून तुम्ही सहज ही रेसिपी बनवू शकता. आतापर्यंत तुम्ही रव्याचा शिरा, लाडू, उपमा, रवा इडली, डोसा हे पदार्थ (Food) खालले असतील पण तुम्ही कधी रवा व्हेज टिक्की खाली आहे का ?चला तर बघुया रवा व्हेज टिक्की कशी बनवतात.
रवा व्हेज टिक्कीसाठी साहित्य -
1/2 कप रवा, 1/3 कप बेसन, 1 छोटी शिमला मिरची, तुमच्या चावी नुसार-हळद, मिठ, काळी, मिरी, लाल तिखट, हिंग, 1कांदा, 1 गाजर, अर्धा कप दही, 2 कप पाणी आणि तेल
कृती -
गरम पाण्यात रवा उकळून घ्या आणि त्याला चांगले शिजवून घ्या.
त्यात स्वाद नुसार मिठ,लाल तिखट, जीर टाकून छान परतून घ्या.
मिश्रण थोडा वेळ शिजल्यावर त्यात चिरलेला कांदा,टोमॅटो टाकून मिक्स करा.
आता यात शिमला मिरची,हिरवी मिरची आणि पाव भाजी मासला टाकून एकजीव करून घ्या.
एकजीव झालेले मिश्रण एका परातीत टाकून पसरून घ्या आणि थोडे गार होऊ द्या.
या सेट झालेल्या मिश्रण चे लहान पिस मध्ये कट करा.
नंतर एका कढईत तेल गरम करून हे पिस दोन्ही बाजू लाल होई पर्यंत फ्राय करून घ्या.
तयार रवा व्हेज टिक्की तुम्ही टोमॅटो सॉस सोबत सर्व करू शकता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.