Makar Sankranti Date Saam tv
लाईफस्टाईल

Makar Sankranti Date : १४ की १५ जानेवारी, मकर संक्रात नेमकी कधी? तारीख अन् शुभ मुहूर्त एका क्लिकवर

Makar Sankranti Date and shubh muhurat : मकर संक्रात नेमक्या कोणत्या तारखेला आहे, जाणून घ्या. तसेच तारीख आणि शुभ मुहूर्त देखील जाणून घ्या.

Vishal Gangurde

मकर संक्रात हा भारतातील प्रमुख सण

हजारो वर्षांची मकर संक्रात सण साजरा करण्याची परंपरा

मकर संक्रात फक्त सण म्हणजे नव्या वर्षाची चाहूल

मकर संक्रात हा भारतातील प्रमुख सणापैकी एक आहे. हजारो वर्षांपासून मकर संक्रात सण साजरा केला जातो. मकर संक्रात फक्त सण नसून नव्या वर्षाची झलक आहे. मकर संक्रातीच्या दिवशी सूर्य देव धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या या राशी परिवर्तनाला संक्रात म्हटलं जातं.

मकर संक्रातीचं महत्व -

मकर संक्रातीच्या मुहूर्ताला सर्वाधिक चांगला वेळ म्हटलं जातं. या काळात पूजा अर्चना केल्यास जलद गतीने चांगलं फळ मिळतं. या सणाचा महाभारतात देखील उल्लेख आहे. भीष्म पितामह यांनी या शूभ मुहूर्ताला देहाचा त्याग केला. त्याचं कारण मोक्ष आणि पुण्याशी जोडलं गेलं आहे. मकर संक्रातीच्या दिवशी स्नान, दान,जप याचं विशेष महत्व असतं. गंगा, यमुना किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान केल्याने मन आणि आत्मा हे दोन्ही शुद्ध राहते.

पुराणानुसार, मकर संक्रातीच्या दिवशी केलेलं दान कधीही वाया जात नाही. यामुळे तिळगूळ, खिचडी, धान्य आणि कपडे दान करणे शुभ मानले जाते. तीळाचं नातं थेट शनीदेवाशी जोडलं जातं. शनि दोष शांतीसाठी या दिवस महत्वाचा असतो. मकर संक्रात वेगवेगळ्या राज्यात विविध नावाने परिचित आहे. काही ठिकाणी या सणाला पोंगल, भोगाली बहू, लोहडी या नावाने संबोधले जाते.

मकर संक्रात - १४ जानेवारी २०२५, बुधवार

शुभ मुहूर्त

महापुण्य काळ - सकाळी ८.४० वाजेपासून ९.०४ वाजेपर्यंत

पुण्यकाळ - सकाळी ८:४२ वाजल्यापासून पुढे

स्नान करण्याची शुभ वेळ : सकाळी ९:०३ वाजेपासून १०:४८ वाजेपर्यंत राहील

यंदा मकर संक्रतीच्या दिवशी षटतिला एकादशीचा अनोखा संयोग असणार आहे. १४ जानेवारी रोजी सूर्य देवासहित भगवान विष्णूच्या पूजेचंही विशेष महत्व असणार आहे. एकादशीच्या दिवशी भात खाणे टाळले जाते. परंतु दान करणे शुभ मानले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT