Makar Sankranti Kite Flying google
लाईफस्टाईल

Makar Sankranti Kite Flying : मकर संक्रांतीला पंतग उडवण्यामागचं 'हे' आहे सगळ्यात मोठं वैज्ञानिक कारण

Scientific Reason Kite Flying : कडाक्याच्या थंडीत तीळगुळ वाटून मकर संक्रांत साजरी केली जाते. यंदा मकर संक्रांतीला सुर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे हा सण १४ जानेवारी २०२५ ला साजरा केला जाणार आहे.

Saam Tv

मकर संक्रांतीला आता फक्त एक दिवस उरला आहे. हा सण महिलांसाठीचा एक उत्सवच असतो. १४ जानेवारीला हा सण साजरा केला जातो. कडाक्याच्या थंडीत तीळगुळ वाटून मकर संक्रांत साजरी केली जाते. यंदा मकर संक्रांतीला सुर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे हा सण १४ जानेवारी २०२५ ला साजरा केला जाणार आहे.

मकर संक्रांतीला सगळे काळे कपडे परिधान करून एकमेकांना शुभेच्छा देतात, तीळगुळ वाटतात, पतंग उडवतात. तर महिला विविध खेळ खेळतात, गाणी गातात, हळदी कुंकू समारंभ ठेवतात. असा हा सण आनंदात साजरा केला जातो. हा सण भारतातच नाही तर जगभरात साजरा केला जातो. याच काळात आपण पतंग का उडवतो? याचं कारण बऱ्याच जणांना माहीत नसेल. चला तर जाणून घेऊ त्यामागचे वैज्ञानिक कारण नेमकं काय आहे.

मकर संक्रांतीच्यावेळी अनेक ठिकाणी पतंगाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात. या महिन्यापासून आपल्याला अनेक बाजारांमध्ये पतंगा दिसतात. पावसाळ्यात याचं प्रमाण कमी असतं. याचं वैज्ञानिक कारण म्हणजे हिवाळा. हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. आपण फार हालचाल करत नाही. म्हणून आपण पतंग उडवायला जातो.

मकर संक्रांतीच्या दिवसापासून नवा ऋतू सुरू होतो. या काळात सुर्यप्रकाश घेणे फायदेशीर असते. सुर्याची किरणे घेतल्याने विविध आजार होण्याची शक्यता कमी असते. यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी हळूहळू सुर्यप्रकाश घेताना पतंग उडवण्याची परंपरा सुरू झाली होती. त्यात लहान मुलं, त्यांचे आई-बाबा, आजी-आजोबा असे कोणीही सहभागी होतात आणि मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी करतात.

पतंग हे स्वातंत्र्य, आनंद आणि शुभ संदेशाचे प्रतिक आहे. मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागे धार्मिक कारण सुद्धा आहे. धार्मिक मान्यतेनुसार या सणाला पतंग उडवण्याची परंपरा ही भगवान रामाच्या काळापासून सुरू झाली आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान रामाने पतंग उडवला आणि तो पतंग इंद्रलोकात उडाला. तेव्हापासून दर मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची स्पर्धा केली जाते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

BJP : भाजप नेत्याचा मुलाच्या कारमध्ये आढळले ड्रग्स, तरुणीसह पळून जाताना पोलिसाच्या अंगावर चढवली कार

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

SCROLL FOR NEXT