
यंदा मकर संक्रांत येत्या मंगळवारी म्हणजेच १४ जानेवारी २०२५ ला साजरी करण्यात येणार आहे. तीन वर्षानंतर योगायोगाने मकर संक्रांत या दिवशी साजरी केली जाणार आहे. साल २०२२,२०२३, २०२४ मध्ये १५ जानेवारीला संक्रांत साजरी केली गेली होती. तर २०२१ मध्ये संक्रांतीचा सण १४ जानेवारीला साजरा करण्यात आला होता. त्यामुळे यंदा तब्बल तीन वर्षांनी संक्रांत १४ जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार सुर्य देव १४ जानेवारीला दुपारी २.५८ वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे. तसेच खरमास समाप्त होणार आहे आणि या मकर संक्रांतीला पुण्याचा काळ सुरू होणार आहे. शालिवाहन शकाच्या पौष महिन्यात संक्रांत येते. शालिवाहन शकाच्या महिने चंद्राच्या भ्रमणावर ठरतात आणि मकर संक्रांत मात्र सुर्याच्या भ्रमणावर ठरतात. ज्या दिवशी सुर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला आपण मकर संक्रांत साजरी करतो.
पूजा
संक्रांतीला पूजा करण्याची शुभ वेळ सकाळी ७.०२ नंतर सुरू होणार आहे. स्नान आणि दान या दोन्हीसाठी हा दिवस शुभ ठरणार आहे. संक्रांतीला दान केल्यानंतर किंवा स्थान केल्यानंतर सुर्य मंत्राचा जप करा. तो जप म्हणजे ''ॐ घृणि सूर्याय नमः, ॐ भास्कराय नमः'' या मंत्राचा जप केल्याने सुर्याची विशेष कृपा तुमच्यावर राहील. या व्यतिरिक्त सुर्य चालीसा किंवा कशाचेही पठन करू शकता. या दिवशी तुम्ही धार्मिक पुस्तकांचे दान करू शकता.
संक्रांतीला अंघोळ केल्याने मिळणारी फळ प्राप्ती
मकर संक्रांतीला गंगा स्नान आणि दान करत असाल तर तुमच्यासाठी हे वर्ष सुखकर जावू शकतं. या दिवशी अंघोळ करून सुर्य देवाची पुजा करणे याला विशेष महत्वाचे मानले जाते. याने आयुष्यात येणारा वाईट काळ दूर होणार आहे. तर जीवनात सुख-समृद्धी सुद्धा येणार आहे. संक्रांत हा पीक आगमनाचा सुद्धा काळ मानला जातो. तर यंदाची संक्रांत तुमच्या परिवारासोबत तिळगुळ वाटून करा आणि आरोग्याची काळजी घ्या.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.