Shreya Maskar
पेमगिरी किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आहे. पेमगिरी किल्ला डोंगरी आहे. सुट्टीत येथे नक्की भेट द्या.
पेमगिरी किल्ला बाळेश्वर डोंगराच्या रांगेत आहे. पेमगिरी किल्ल्याला शहागड किंवा भीमगड म्हणूनही ओळखले जाते.
पेमगिरी किल्ला ट्रेकिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे. हा सोपा ट्रेक आहे. किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.
संगमनेर तालुक्यातून रिक्षाने किंवा बसने तुम्ही पेमगिरी किल्ल्या पर्यंत पोहचू शकता. हिवाळ्यात येथे आवर्जून भेट द्या.
पेमगिरी किल्ल्यावर एक मोठा वटवृक्ष आणि जुने पाण्याचे टाके आहेत. येथे हिरवेगार वातावरण पाहता येते.
पेमगिरी किल्ला स्वराज्य संकल्प भूमी म्हणून ओळखला जातो. कारण शहाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेमध्ये या किल्ल्याचा मोठा वाटा आहे.
पेमगिरी किल्ल्याच्या परिसरात पेमादेवीचे मंदिर आहे. ज्याला पेमाईदेवी म्हणूनही ओळखले जाते. येथे स्थानिक लोक आवर्जून येतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.