Shreya Maskar
लोणावळा-खंडाळा ते कर्जत दरम्यान उल्हास व्हॅली पसरलेली आहे. उल्हास व्हॅली हे मुंबईजवळील पर्यटनाचे उत्तम ठिकाण आहे.
उल्हास व्हॅली ज्याला 'कॅनिओन व्हॅली' आणि 'व्हॅली ऑफ शॅडोज' असेही म्हणतात. हे ठिकाण निसर्गरम्य सौंदर्य, धबधबे आणि हिरवीगार वनराईसाठी ओळखले जाते.
ल्हास व्हॅलीच्या मधून उल्हास नदी वाहते. निसर्गाचा सुंदर नजारा येथे पाहायला मिळतो. त्यामुळे तुम्ही येथे वीकेंडला फिरायला जाण्याचा प्लान करा.
उल्हास व्हॅली हे ट्रेकिंग आणि साहसी क्रिडांसाठी एक प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे हायकिंग, कॅम्पिंग आणि रिव्हर राफ्टिंग करता येते.
पावसाळा आणि हिवाळ्यात उल्हास व्हॅलीला आवर्जून भेट द्या. या काळात येथे पर्यटकांची भरपूर गर्दी पाहायला मिळते. येथील वातावरण तुमच्या मनाला भुरळ घालते.
उल्हास व्हॅली हे वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांच्या विविध प्रजातींनी समृद्ध आहे. येथे घनदाट जंगले, नद्या आणि डोंगर आहेत.
निसर्गाच्या सानिध्यात फोटोग्राफी करण्यासाठी उल्हास व्हॅली हे बेस्ट लोकेशन आहे. तुम्ही येथे मित्रांसोबत आवर्जून भेट देऊ शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.