Maharashtra Live News Update: नंदुरबार शहरासह परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज रविवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, फलटणमध्ये बीडच्या महिला डॉक्टराची आत्महत्या, महाराष्ट्रात पावसाचा इशारा, राज्यातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

Nandurbar : नंदुरबार शहरासह परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात

हवामान खात्याने वर्तवलेला अंदाजानुसार मागील अर्ध्या तासापासून नंदुरबार शहरासह परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात

या परतीच्या पावसामुळे काढणीला आलेले कापूस, सोयाबीन, मका सह मिरची पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता

या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून सुटका तर शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

नंदुरबार शहरातील अनेक सकल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात

Nashik : लासलगाव, पिंपळगाव नजीकसह परिसरात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग

नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगाव, पिंपळगाव नजीकसह परिसरात रात्रभर झालेल्या जोरदार पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे हाल केले आहेत. अख्खी रात्र पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचून तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काही ठिकाणी विहिरीमध्ये पावसाचे पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने विहिरीचे नुकसान झाले आहे.

Pune News : शिवसेनेचे रवींद्र धंगेकर देणार उद्या जैन बोर्डिंगला भेट

शिवसेनेचे रवींद्र धंगेकर जैन बोर्डिंगला उद्या भेट देणार आहेत.

रवींद्र धंगेकर घेणार udya जैन मुनी यांचे आशीर्वाद

जैन मुनी यांनी धंगेकर यांना उद्या आंदोलन करू नका म्हणून केले आहे आवाहन

Summary

Pune : पुण्यात शिक्रापूरला वाहतूककोंडी, पाच किलोमीटरपर्यंत रांगा

पुणे आहिल्यानगर महामार्गावर वाघोली,कोरेगाव भिमा ,रांजणगाव, शिक्रापूरला वाहतुककोंडी

भर पाऊसात वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा

पाऊसात वाहतुककोंडीमुळे प्रवाशांचे हाल

भर पाऊसात वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलीसांची कसोटी

PSI गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलिस कोठडी

धुळ्यात जोरदार पावसाला पुन्हा सुरुवात

सकाळपासून अधून मधून रिमझिम पावसाची हजेरी परंतु संध्याकाळी मात्र जोरदार पावसाला सुरुवात

अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांची उडाली तारांबळ

हवामान विभागातर्फे धुळे जिल्ह्याला देण्यात आला होता यलो अलर्ट

हवामान विभागातर्फे देण्यात आलेल्या अंदाजानुसार जोरदार पावसाला सुरुवा

पिंपरी चिंचवड शहरातील पिण्याचा पाणीपुरवठा करणारी एक मोठी लाईन फुटली

त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाईपलाईन मधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असल्याने जवळपास दहा ते पंधरा फूट उंच आकाशात कारंजे उडत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने पाईपलाईन ची दुरुस्ती करून पाण्याचा अपव्य थांबवावा अशी मागणी शहरातील शहरातील नागरिकांनी केली आहे.

पुढील ३ तासात जळगाव, ठाणे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस

तसेच विजांच्या कडकडाटासह ताशी ३०ते४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई.

परतीच्‍या पावसाचा अलिबागमध्ये प्रवासी आणि पर्यटकांना फटका

दिवाळीची सुट्टी आणि विकएंडमुळे रायगडमधील अलिबागसह सर्वच समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी गर्दी केली आहे. पर्यटनाची मजा लुटून परतीचा प्रवास सुरु करणाऱ्या या पर्यटक, प्रवाशांचे पावसामुळे चांगलेच हाल झाले आहेत. समुद्रातील खराब हवामानामुळे मांडवा ते गेट वे ऑफ इंडीया हि फेरी बोट बंद आहे. याचा ताण रस्ता प्रवास म्हणजे ST वर पडला असून अलिबाग बसस्‍थानकात तोबा गर्दी झाली आहे.

मुंबईच्या पश्चिम दुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव आरे ब्रिजवर टेम्पो आणि कार मध्ये जोरदार अपघात झाल्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर ही मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे

वांद्रे कडून बोरिवलीचे दिशेने जाणारा मार्गावर गोरेगाव जोगेश्वरी अंधेरी विलेपार्ले सांताक्रुज या सर्व परिसरात ही मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

पावसामुळे मध्यरेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने

बदलापूरला पुन्हा एकदा परतीच्या पावसाने झोडपून काढलय. गेल्या तासाभरापासून बदलापुरात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे.

रायगडमध्ये जोरदार पाऊस, आठवडाभरापासून कोसळत आहे परतीच्या पावसाच्या सरी

रायगडमध्ये जोरदार पाऊस

सलग आठवडाभर कोसळत आहेत परतीच्या पावसाच्या सरी

पावसाचा जोर वाढत असल्याने भातपिक धोक्यात

अनेक ठिकाणी भाताच पिक शेतात साठलेल्या पाण्यात पडल्याने खराब होण्याची भिती

पावसाचा जोर कमी होत नसल्याने भात कापणीच्या कामांचा खोळंबा

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का; पाटील यांचे तीन शिलेदार कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गोटात जाणार

इंदापूर शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या तंबूतून तीन महत्वाचे शिलेदार लवकरच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पारदर्शी एसआयटी नेमावी: सुप्रिया सुळे

त्या कुटुंबाशी माझी चर्चा झाली आहे. सरकारने पारदर्शी एस.आय.टी नेमावी. कुठलाही राजकीय दबाव न येता पारदर्शक चौकशी करावी. महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Pune News : रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांनी विमानतळावर केलेल्या भ्रष्टाचाराचा पुरावा दिला

केंद्रीय मंत्री पदाचा गैरवापर करत मुंबई फ्लाईंग क्लब वर दाखवलेल्या मेहरबानीमुळे हवाई उड्डाण विभागाचे सुमारे 197 कोटी रुपयांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून ज्या क्लबला याचा फायदा मिळवून दिला त्या मुंबई फ्लाईंग क्लबने विशाल गोखले यांच्यासाठी प्रायव्हेट जेट पाठवले होते.

यामागे नेमकी कोणत्या प्रकारच्या कामाची दलाली श्री.विशाल गोखले मार्फत केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे हा तपासाचा विषय आहे. याबाबत श्री मुरलीधर मोहोळ यांनीच खुलासा करावा.

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतरही रवींद्र धंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम

एकनाथ शिंदेंनी रविंद्र धंगेकरांना पुण्यातला धंगेकर आणि मोहोळ यांच्यातला वाद संपवुन टाका असं म्हटलं

मात्र तरीही जैन मंदिराची जागा मोकळी झाल्याशिवाय धंगेकर थांबणार नसल्याचे धंगेकरांनी स्पष्ट केलं आहे

Political News : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे तीन शिलेदार कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गटात जाणार

इंदापूर शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या तंबूतून तीन महत्वाचे शिलेदार लवकरच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या तिन्ही नेत्यांमध्ये माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, हर्षवर्धन मोटार वाहतूक संघाचे माजी अध्यक्ष रघुनाथ राऊत, तसेच माजी नगरसेवक गोरख शिंदे यांचा समावेश आहे.

हे तिघेही लवकरच म्हणजे येतो दोन दिवसांत मुंबईत औपचारिकरीत्या उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत.

Nashik News : निफाडच्या पूर्व भागात परतीच्या पावसाचा हाहाकार शेतीचे मोठे नुकसान

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याच्या पूर्व भागात काल रात्री झालेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. गोळेगाव, गोंदेगाव,आणि मरळगोई परिसरात पावसाचा जोर अधिक होता.

या अतिवृष्टीमुळे परिसरातील नद्यांना पूर आला असून, काही ठिकाणी बंधारे फुटल्याने पुराचे पाणी थेट शेतात शिरले.

या पाण्यामुळे विशेषतः मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात नद्यांचे पाणी शिरल्याने उभ्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

Pune: दिवाळीच्या गर्दीत हरवला चिमुकला, पोलिसांनी अवघ्या 15 मिनिटांत शोधला

दिवाळीच्या लगबगीत आणि प्रवाशांच्या गर्दीत पुणे रेल्वे स्थानकावर एक सहा वर्षाचा चिमुकला हरवला होता. गर्दीत शोधुनही मुलगा सापडेना. अखेर मुलगा हरवला अन आपल्यापासून कायमचा दुर गेला, या भितीने त्याचे आई आणि वडील लहानमुलाप्रमाणे पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरच डसाडसा रडले. मात्र, तिथे गस्तीवर तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या गस्तीवरील निरीक्षकांनी त्याला अवघ्या 15 मिनिटांत शोधुन त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले.

पुणे रेल्वे स्थानकावर ही घटना 19 ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. रवी खेतावर, त्यांच्यासोबत त्यांची पत्नी पूजा आणि सहा वर्षाचा मुलगा अजय हे तिघे ही तेलंगणा चे आहेत..

भगिनीला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटण दौऱ्यावर आहेत. विविध विकासकामांचं भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार. यावेळी डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले पाहा.

आमच्या भगिनीनं आत्महत्या केली, हे अतिशय दुर्देवी.

सत्य बाहेर येत आहे.

प्रत्येक गोष्टी राजकारण घुसवण्याचं काम, हे निंदनीय. विरोधकांकडून राजकारण करण्याचा प्रयत्न.

भगिनीला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही.

प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण सुरू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

शिवसैनिक हा सदैव तत्पर असतो तयार असतो; मंत्री संजय राठोड

शिवसैनिक हा सदैव तत्पर असतो तयार असतो; मंत्री संजय राठोड

अतिशय महत्वाचे हे प्रशिक्षण आहे,यवतमाळ जिल्ह्यात जेवढे पदाधिकारी झाले त्याना प्रशिक्षित करण्यासाठी हे शिबीर आहे

आम्ही सज्ज आहोत एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तिथं तिथे महायुती म्हणून लढन शक्य नसेल तर मैत्रीपूर्ण लढत करा

आम्ही शिवसेना म्हणून लढण्यासाठी तयार महायुती म्हणून ही लढण्यासाठी तयार आहो त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना सर्व ताकतीने लढण्यासाठी तयार असल्याचे विधान यवतमाळ पालकमंत्री संजय राठोड यांनी केल.

संत गोरोबाकाकाची पालखी पंढरीच्या कार्तिकी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ

वारकरी संप्रदायातील थोर संत गोरोबाकाका यांची पालखी तेर येथुन कार्तिक एकादशीच्या वारीसाठी पंढरपूर कडे मार्गस्थ झाली आहे.आज धाराशिव शहरात संत गोरोबा कुंभार यांच्या पालखीचे फटाक्याची आतषबाजी करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले तर गोरोबाकाकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला मात्र आपलं दुःख विसरून शेतकरी वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले असून आपल्या लाडक्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी वारकरी आतुर झालेला पाहायला मिळाला.

मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासमोरच राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाची चव्हाट्यावर

आगामी आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समोरच पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मुंबईला वारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यां बद्दल केली नाराजी व्यक्त,

जुन्या व निष्ठावान पदाधिकाऱ्यांना डावलून नव्या पदाधिकाऱ्यांचे तुम्ही काही ऐकू नका, कंभरणाऱ्याला पहिले तू किती निवडणुका लढवल्या याबाबत विचारणा करा असं म्हणत सध्या पक्षामध्ये कान भरून पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर चांगलीच आगपाखड केली

चांदसैली घाटातील सातपायरी वळणार कोसळली दरड

चांदसैली घाटातील सातपायरी वळणार पावसामुळे कोसळली दरड...

उंच शिखर वरून दगडाचा भला मोठा खच रस्त्यावर आल्याने घाट मार्ग बंद....

धडगाव तालुक्याला नंदुरबार जिल्ह्याला जोडणाऱ्या चांदसैली घाट बंद....

दरड रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना होत नसल्याने वारंवार कोसळते दरड....

घाटमार्ग बंद झाल्यानंतर अनेक वाहने अडकली घाटात....

बडनेरा मध्ये 27 वर्षीय उच्चशिक्षित युवतीची संशयास्पद आत्महत्या

बडनेरा येथील ही युवती असून तिने घरी फासावर लटकून केली मध्यरात्री आत्महत्या..

रणदीप कौर रियाड असं मृत युवतीचे नाव असून ती

MSC शिकलेली असून ती एका खाजगी कोचिंग क्लासेसवर शिकवत होती...

या घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला असून पुढील तपास बडनेरा पोलीस करत आहेत

हवामान खात्याचा नंदुरबार जिल्ह्याला येलो अलर्ट

नंदुरबार तालुक्यातील शनिमाडळ गावात जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी चे कादा रोप कापुस मका कांदा या सारख्या अन्य पिकांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे एकीकडे कांदा ला भाव नाही आणि दुसरी कडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे , तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

अवकाळी पावसाने शेतकऱ्याचा कापूस भिजला

अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे वेचणीला आलेला शेतकऱ्यांच्या कापूस भिजला आहे. जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात आज पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा कापूस हा पूर्णतःपाण्यात भिजवून गेलेला आहे.शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पुन्हा अवकाळी पावसाने हिसकून घेतला आहे.दिवाळीपूर्वी शासनाने मदत देण्याची घोषणा केली होती मात्र ती घोषणा फक्त कागदावरच राहिली तर दुसरीकडे राबराब कष्ट करून जे काही पीक हातात येणार होते ते सुद्धा आता पाण्याने भिजून गेले. आहे बळीराजा आता पूर्णतः हवालदिन झालेला आहे

nashik-yeola-ट्रकच्या धडकेत पादचाऱ्यांचा मृत्यू

येवल्यातील अपघातांचा सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये महिन्याभरात रस्त्या अपघातामध्ये चार ते पाच जणांचे बळी गेले असून आज सकाळी विंचूर चौफुली या ठिकाणी विस्कटलेल्या वाहतूक व्यवस्थेचा आणखी एक बळी गेला आहे.

फलटण मधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन

आत्महत्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी विद्यार्थी युवक काँग्रेसच्या आंदोलन

पुण्यातील गुडलक चौकात विद्यार्थी युवक काँग्रेस कडून आंदोलन

खंडाळा घाटात गव्याचा वावर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

खंडाळा घाटातील गारमाळ परिसरात गव्याचे दर्शन झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गव्याचा वावर स्पष्टपणे दिसत असल्याने परिसरातील नागरिक आणि पर्यटकांमध्ये याची मोठी चर्चा रंगली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेत तपास सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळा खंडाळा परिसरात वन्यजीवांच्या हालचाली वाढल्याचे दिसून येत आहे. बोरघाट व लोणावळ्या जवळील कुरवंडे घाटमाथ्यावर व जंगल परिसरात रानटी गवा व बिबट्याचा वावर यापूर्वी आढळला आहे.

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबईकडून पुण्याकडे जाणऱ्या लेन वर वाहनांच्या मोठ्या रांगाच रांगा.

दिवाळी सुट्टी तसेच विंकेड मुळे महामार्गावर वाहतुक कोंडी...

पोलिस प्रशासना कडून वाहतुक कोंडी सोडविण्या साठी १५ मिनिटांचा ब्लॉक चा पर्याय...

सिंदखेडराजा तालुक्यासह किनगाव राजा परिसरात मुसळधार पाऊस.. शेतकरी संकटात...

सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा महसूल मंडळात पळसखेड चक्का येथे पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसाने कपाशी आणि सोयाबीन या प्रमुख पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच दोन महिन्यांपासून चालू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकरी हैराण झाले असताना, आता दिवाळीच्या तोंडावर कपाशी पिक पूर्णपणे पाण्यात भिजले आहे...अगोदरची अतिवृष्टीची मदत मिळालेली नाही त्यात राहिलेले थोडेफार पिकांचंही या पावसाने नुकसान झाले असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे..

महिला डॉक्टर यांच्या कुटुंबीयांना खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन द्वारे संवा

कुटुंबीयांकडून खासदार सुप्रिया सुळे यांना सांगण्यात आले की तपास करत असताना स्थानिक पोलीस हस्तक्षेप करत आहेत तपास एस आय टी कडे देण्यात यावा अशी मागणी कुटुंबियांनी सुप्रिया सुळेंकडे केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबियांसोबत फोन द्वारे संवाद साधत या प्रकरणांमध्ये जोपर्यंत हा तपास शेवटच्या आरोपी पर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि सर्वांना शिक्षा झाली पाहिजे असा विश्वास यावेळी दिला यावेळी कुटुंबीयांनी खासदार सुप्रिया सुळे यांना संपूर्ण व्यथा सांगितल्या.

नाशिक मुंबई महामार्गावरील इंदिरानगर बोगदा सोमवारपासून ९ महिन्यांसाठी राहणार बंद

- जुन्या बोगद्याची लांबी वाढवण्यासोबतच ग्रेड सेपरेटर फ्लॉय ओव्हरच्या कामासाठी इंदिरानगर बोगदा राहणार बंद

- महामार्ग प्राधिकरणाकडून उद्यापासून सुरू करण्यात येणार काम

- इंदिरानगर बोगद्यातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

- वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलीस प्रशासनाचं आवाहन

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण दौऱ्यावर

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण येथे कृतज्ञता मेळाव्यासाठी येत आहेत. या मेळाव्या मध्ये फलटण मधील विविध विकास कामांचं ऑनलाईन भूमिपूजन सुद्धा होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे देखील उपस्थित राहणार आहेत. गेल्या दोन दिवसापासून फलटणमध्ये डॉक्टर महिला आत्महत्याचे प्रकरण गाजत असताना आज मुख्यमंत्री फलटणमध्ये येत असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलचा राहणार गणातून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी

गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा बंद

खराब हवामानाचा फटका जलवाहतूक सेवेला बसलाय. गेट वे ते मांडवा ही जलवाहतूक सेवा काल संध्याकाळ पासूनच बंद करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर रायगडच्या किनाऱ्यांवर तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. समुद्रात धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे ही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय मेरी टाइम बोर्डाने घेतला आहे. या मार्गावरील नियमित प्रवाशांची यामुळे गैरसोय झाली आहे. अलिबाग मुरूड परिसरात सुटीसाठी फिरायला आलेल्या पर्यटकांना आता परतीचा प्रवास करताना रस्ते मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व्यासपीठावर, भाजप आमदार मुटकुळेंनी शिवसेना आमदाराला थेट इशारा दिला

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याआधी हिंगोलीत राजकीय वार सुरू झाले आहेत, महायुतीत मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र लढणाऱ्या शिवसेनेने हिंगोलीत मित्र पक्षातील नेत्यांशी चर्चा न करता स्वबळाचा नारा देत निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे, शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी शहरात व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी देखील सुरू केल्या आहेत दरम्यान भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी मात्र शिवसेना आमदारावर नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या एका कार्यक्रमात आमदार मुटकुळे यांनी गंभीर आरोप केले आहेत,मित्र पक्षातील स्वबळाचा नारा देणारे काहीजण व्यापाऱ्यांना मतदानासाठी धमक्या देत असल्याचे सांगत इटका का जवाब पत्थर से मिलेगा असा इशारा दिला आहे तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील कोण अंगावर येत असेल तर शिंगावर घ्या असे म्हणत शिवसेनेला डिवचले आहे

त्यामुळे विरोधी पक्ष आधी हिंगोलीत महायुतीतील दोन महत्त्वाचे पक्ष व नेते एकमेकांना भिडल्याचं चित्र आहे

धाराशिव शहरातील रस्त्यांसाठी 117 कोटींच्या कामांना मंजुरी

नगरपरिषद निवडणुकीपूर्वी धाराशिव साठी महायुती सरकारने मोठा निर्णय घेतलाय.धाराशिव शहरातील रस्त्यांसाठी 117 कोटींच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत या कामाचं लवकरच भूमिपूजन होईल अशी माहिती भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. धाराशिव शहरात 26 किलोमीटरचे 59 रस्ते या निधीतून होणार आहेत 18 महिन्यांमध्ये काम पूर्ण होईल असंही पाटील यांनी सांगितलं. अनेक दिवसांपासून शहरातील रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित होता त्यामुळे आता खड्ड्यातून धाराशिवकरांची सुटका होणार आहे.

सलग दुसऱ्या दिवशी अमरावती जिल्ह्यात पावसाची हजेरी

सलग दुसऱ्या दिवशी अमरावती जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची दानदान उडाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेलं शेकडो क्विंटल सोयाबीन भिजलं आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे पाहायला मिळत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झाले असून आधीच सोयाबीनला भाव नाही त्यात पाऊसाने सोयाबीन भिजल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने नुकसान भरपाई द्यावी आणि नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

महादेव खोरी परिसरात बिबट सह दोन पिल्लांचा वावर

वडाळी वनपरिक्षेत्रा लगत असलेल्या महादेव खोरी परिसरातील मंगलधाम व गौतम नगर या मानवी वस्तीत एक बिबट दोन पिलासह फिरत असल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.मंगलधाम कॉलनी मध्ये एका इसमाने आपल्या घरात एक बिबट दोन पिल्लांसह शिरल्याची वनविभागाला माहिती दिली.वन विभागाचे पथक पोहोचण्यापूर्वीच बिबट पिलासह त्या ठिकाणाहून बाहेर जाताना सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला.मात्र नागरी वस्तीत बिबट्या शिरल्याने परिसरातील नागरिक चांगलेच धास्तावलेले आहेत.वनविभागाने या परिसरात सतर्कतेच्या इशाऱ्याचे फलक लावले असून रात्रीच्या वेळी नागरिकांनी तसेच लहान मुलांनी बाहेर पडू नये व स्वतःची काळजी घ्यावी असा इशारा वन विभागाने दिलेला आहे.

इंदापूर बस स्थानकावर मध्यरात्री एसटीला आग

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इंदापूर शहरातील बस स्थानकावर प्रवासी घेऊन आल्यानंतर उभे असलेल्या बसने अचानक पेट घेतला. यावेळी प्रसंगावधान राखत प्रवासी बस मधून बाहेर आले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण बस जळाली यामुळे बसचे पूर्णपणे नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी की,बस (क्रमांक एम एच 20 बी एल 4233) ही धाराशिव पुणे बस मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास इंदापूर बस स्थानकाच्या फलाट क्रमांक 11 वर आली. याच वेळी बस ने अचानक पेट घेतला. इंधन गळतीमुळे बसला अचानक आग लागल्याचे बोलले जात आहे. ज्यावेळी आग लागली त्यावेळी बस मध्ये जवळपास 50 प्रवासी होते त्यामुळे अचानक एकच गोंधळ उडाला प्रवाशांनी कसाबसा आपला जीव वाचवला. मात्र या आगीत बस आणि प्रवाशांच्या साहित्याचे पूर्णपणे नुकसान झाले. अशी प्राथमिक माहिती असून याबाबत इंदापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्याबाबत पुढील प्रक्रिया सुरू आहे.

दिवाळीनंतर मुंबई - पुण्यात परतण्याची लगबग,   महामार्गावर कोंडीची शक्यता

दिवाळीनंतर मुंबई - पुण्यात परतण्याची लगबग

महामार्गावर कोंडीची शक्यता पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना

दिवाळीत मूळ गावी गेलेले शहरवासीय पुणे मुंबईकडे परतण्यास सुरुवात झालीय...

या प्रवाशांच्या मोटारी खाजगी बस मुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता

या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलीस पुणे पोलीस तसेच पिंपरी चिंचवड पोलीस वाहतूक आणि वाहन चालकांना महामार्ग यांच्यापर्यंत मार्गाचा वापर करावा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करावा अशा सूचना दिल्या आहेत...

Maharashtra Live News Update : मंत्री पंकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची घेतली भेट

फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली. तिच्या कुटुंबीयांची काही वेळापूर्वी मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमधील तिच्या गावी जात भेट घेतली आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं मी आता संपुर्ण माहिती घेतली आहे. तिच्या जुन्या काही कंप्लेंट आहेत. तिच्यावर झालेल्या अन्यायमध्ये कोण आहे किंवा नेमकं काय घडलंय याबाबत चौकशी होणं गरजेचं आहे.

हा गंभीर विषय आहे मी देवेंद्रजी फडणवीस यांना भेटणार आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्याकडून नि:पक्षपाती याची चौकशी झाली पाहिजे कोणालाही पाठीशी घातलं जातंय असं वाटणार नाही हा आग्रह मी धरणार आहे. आणि न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही. आरोपींना कठोर शिक्षा होईल असे सांगत कुटुंबीयांना मंत्री पंकजा मुंडे यांनी धीर दिला. तर या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी केली जाईल असे आश्वासन देखील दिले.

आमदारकीसाठी पाय चाटणारी आमची औलाद नाही; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची आमदार उत्तम जानकर यांच्यावर टीका

ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माळशिरसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर पलटवार केला आहे.

आमदारकीसाठी पाय चाटणारी आमची औलाद नाही अशा शब्दात उत्तम जानकर यांच्यावर टीका केली. आमदार जानकर यांनी दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टिका केली होती. जानकर यांच्या टिकेला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्या भाषेत उत्तर दिले.

माळशिरस येथे माजी आमदार राम सातपुते यांनी स्नेह मिलन मेळावा आयोजित केला होता. आम्ही कंबर मोडायच्या नादी लागत नाही, आम्ही कंबरेच्या खाली मारतो. जाता जाता मारतो ...मी काय अकलूजकर नाही अशी टीकाही जयकुमार गोरे यांनी केली.

अकलूजच्या सुमित्रा पंतस्थेतील गैरव्यवहाराची चौकशी करावी;

माळशिरसचे भाजपचे माजी आमदार राम सातपुते पुन्हा मोहिते पाटील यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. अकलूजच्या सुमित्रा पंतस्थेतील गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. पंतस्थेने अनेक शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज काढून शेतकर्यांची फसवणूक केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत. याची चौकशी करावी या मागणीसाठी जन आंदोलन केले जाईल. प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालया समोरही न्यायासाठी आंदोलन केले जाईल असा इशाराही राम सातपुते यांनी दिला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर मोहिते पाटील विरूद्ध राम सातपुते असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

भाजपा आमदार सुरेश धस मयत डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांचे आज कवडगाव येथे सांत्वन पर भेट घेणार आहेत

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेने सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली आणि या आत्महत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी कुटुंबीय ठाम असून आता लोकप्रतिनिधींकडून डॉक्टर यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेऊन या प्रकरणात शेवटपर्यंत सोबत असण्याचा विश्वास दिला जात आहे आज स्वतः आष्टी विधानसभा मतदारसंघ भाजपाचे आमदार सुरेश धस हे त्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी

यवतमाळ जिल्ह्यात रात्री दरम्यान अनेक भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगली तारांबळ उडाली असून सध्या कापूस वेतनीवर आलाय तर सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात आहे.त्यामुळे अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना जोरदार फटका बसलाय, कापूस संपूर्ण भिजलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com