What Is a Silent Heart Attack saam tv
लाईफस्टाईल

Silent heart attack risk: सायलेंट हार्ट अटॅकपूर्वी शरीरात होतात हे बदल; कोणाला असतो जास्त धोका, जाणून घ्या

What Is a Silent Heart Attack: आजकाल हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत आहे, आणि चिंतेची बाब म्हणजे अनेकदा याची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत, याला 'सायलेंट हार्ट अटॅक' म्हणतात. अशावेळी शरीरात होणारे किरकोळ बदलही गंभीर हृदयविकाराचे संकेत असू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • सायलेंट हार्ट अटॅक लक्षणे न दाखवता घडू शकतो.

  • असामान्य आणि सतत थकवा हे मुख्य लक्षण आहे.

  • थकवा हळूहळू वाढतो, म्हणून तो दुर्लक्षित होतो.

हार्ट अटॅक म्हटलं की आपण लगेच छातीत तीव्र वेदना, जास्त घाम अशा लक्षणांची कल्पना करतो. मात्र सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकाराचा असा प्रकार जो कोणत्याही मोठ्या लक्षणांशिवाय घडू शकतो. त्यामुळेच तो अधिक धोकादायक ठरतो.

अशा प्रकारच्या अटॅकची ओळख अनेकदा ECG काढल्यानंतरच होते. तोपर्यंत तो येऊन गेलेला असतो. त्यामुळे लवकर लक्षात घेणं आणि वेळीच तपासणी करणं फार महत्त्वाचं आहे.

सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे असामान्य थकवा

जर सतत थकवा जाणवत असेल आणि तो विश्रांतीनंतरही कमी होत नसेल तर हे हृदय कमजोर होत असल्याचं संकेत असू शकतो. हा थकवा सामान्य नसून तो खोलवर जाणवतो. यावेळी कामात लक्ष लागत नाही आणि दिवसेंदिवस थकवा वाढत जातो.

हा थकवा दुर्लक्षित का होतो?

कारण हा थकवा हळूहळू वाढतो. यावेळी तुम्हाला ना छातीत वेदना, ना धाप लागणं अशी कोणतेही लक्षणं जाणवत नाही. लोक बहुतेक वेळा हे ताण-तणाव, झोपेचा अभाव किंवा थोडासा आजार म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र हेच दुर्लक्ष तुम्हाला महागात पडू शकतं.

साइलेंट हार्ट अटॅकची इतर लक्षणं

  • छातीत जडपणा किंवा गुदमरल्यासारखं वाटणं

  • श्वास घेण्यात त्रास होणं

  • पाठ किंवा जबड्यात किरकोळ वेदना

  • चक्कर येणं

  • घाम येणं

  • मळमळ, उलटी

मुख्य म्हणजे ही लक्षणं सामान्य वाटतात पण सतत जाणवत असतील तर हृदयविकाराची शक्यता नाकारता येत नाही.

सायलेंट अटॅकचा धोका

ज्यावेळी अशा प्रकारचा हार्ट अटॅक ओळखला जात नाही, तेव्हा हृदयात कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं. यामध्ये हृदयाची कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे पुढे जाऊन हार्ट फेल होणं, हृदयाचे ठोके अचूक होणं, स्ट्रोक किंवा अचानक मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

सायलेंट हार्ट अटॅकचा धोका कोणाला?

सायलेंट हार्ट अटॅक कोणालाही होऊ शकतो, पण खालील लोकांमध्ये धोका जास्त असतो:

  • मधुमेह असलेले लोक

  • जास्त कोलेस्ट्रॉल किंवा बीपी असणाऱ्या व्यक्ती

  • सतत धूम्रपान

  • ५० वर्षांपेक्षा अधिक वयाचे

  • लठ्ठपणा असलेले लोक

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय?

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकाराचा असा प्रकार जो कोणतीही जास्त लक्षणे न दाखवता घडतो आणि नंतर ECG द्वारे ओळखला जातो.

सायलेंट हार्ट अटॅकचे मुख्य लक्षण कोणते?

सायलेंट हार्ट अटॅकचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे असामान्य आणि सतत जाणवणारा थकवा, जो विश्रांतीनंतरही कमी होत नाही.

या थकव्याकडे दुर्लक्ष का केले जाते?

हा थकवा हळूहळू वाढत असल्यामुळे आणि छातीत वेदना नसल्यामुळे लोक त्याकडे ताण, तणाव किंवा झोपेचा अभाव म्हणून दुर्लक्ष करतात.

सायलेंट हार्ट अटॅकची इतर लक्षणे कोणती?

छातीत जडपणा, श्वास घेण्यात त्रास, जबडा किंवा पाठदुखी, चक्कर येणे, घाम येणे आणि मळमळ यांचा समावेश होतो.

सायलेंट हार्ट अटॅकचा धोका कोणाला अधिक असतो?

मधुमेह असलेले, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा रक्तदाब असलेले, धूम्रपान करणारे, ५० वर्षांवरील आणि लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींना सायलेंट हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

SCROLL FOR NEXT