Main Entrance Vastu Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Main Entrance Vastu Tips: घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवाचा फोटो लावावा की नाही, जाणून घ्या 5 महत्वाचे नियम

God Idol On Main Door Vastu: घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवाचा फोटो लावावा की नाही? वास्तूशास्त्रानुसार योग्य दिशा, ५ महत्त्वाचे नियम आणि नकारात्मक ऊर्जा घालवण्याचे उपाय जाणून घ्या.

Manasvi Choudhary

घराचा मुख्य प्रवेशद्वार हा सकारात्मक उर्जा आणि माता लक्ष्मीच्या आशिर्वादासाठी महत्वाचा मानला जातो. अनेकजण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवाची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार, देवाची मूर्ती किंवा फोटो योग्य ठिकाणी न लावल्यास अशुभ परिणाम होऊ शकतो. मुख्य प्रवेशद्वारावर देवतांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवण्याचे योग्य नियम, दिशा आणि महत्वाच्या वास्तू टिप्स कोणत्या ते जाणून घ्या.

वास्तुशास्त्रानुसार,घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोणतीही शुभ मुर्ती किंवा फोटो स्थापना करण्यापूर्वी योग्य दिशा निवडणे महत्वाचे आहे. त्यासाठी काही वास्तू नियम

उत्तर दिशा आणि ईशान्य दिशा: वास्तुशास्त्रानुसार,उत्तर दिशा आणि ईशान्य दिशा ही देव- देवीतांचे स्थान आणि कुबेराची दिशा मानली जाते त्यामुळे या दिशेला पवित्र आणि शुभ स्थान मानले जाते.

पूर्व: पूर्व दिशा सूर्यदेवाशी संबंधित आहे त्यामुळे या दिशेला तुम्ही देव- देवीतांचा फोटो ठेवू शकता यामुळे घरात सुख - समृद्धी येते.

दक्षिण किंवा नैऋत्य दिशा: जर तुमच्या घराच प्रवेशद्वार दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला असेल तर तेथे देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवणे टाळावे असे केल्याने घरात तणाव आणि नकारात्मक उर्जा पसरू शकते.

मुख्य दरवाजाजवळदेवाची मूर्ती ठेवण्याचे नियम

  • वास्तुशास्त्रानुसार,घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते.

  • घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवी कालभैरव, भगवान शंकराचे उग्र रूप या देवांच्या मूर्ती ठेवणे टाळावे.

  • देव-देवीतांची फोटो चांगल्या ठिकाणे ठेवावे. धूळ पादत्राणे अशुद्ध उर्जा या ठिकाणी देवांच्या मूर्तीची स्थापना करू नये.

मुख्य प्रवेशद्वारावर मूर्तीऐवजी या वस्तू ठेवा

  • जर तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकारात्मकता टिकवून ठेवायचे असेल तर खालील उपाय करा.

  • शुभ चिन्हे घराच्या मुख्यप्रवेशद्वारावर स्वास्तिक, ओम किंवा त्रिशूळ काढून कुंकू लावा.

  • तोरण लावा

  • घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे तसेच झेंडूच्या फुलांचे तोरण लावा.

Maharashtra News Live Update: हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाचा जोरदार तडाखा; रस्ते जलमय, नागरिकांची तारांबळ

Kitchen Cleaning : किचनचा घाणेरडा कपडा कितीही स्वच्छ केला तरीही वास जात नाही, अशावेळी काय कराल?

सोशल मीडियावर 11 लाख फॉलोअर्स; पण मतं फक्त 444! प्रसिद्ध इन्फ्लएन्सरचा दारुण पराभव

Water Cut : नवी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! मंगळवारी नळाला पाणी येणार नाही, कोणते भाग प्रभावित?

1 फ्लॅट, 3 पुरूष आणि 1 तरुणी; लातूरमध्ये वेश्याव्यवसायाचा भांडाफोड, पोलिसांनी असा रचला सापळा

SCROLL FOR NEXT