Til Gud Ladoo Recipe: थंडी वाढायला सुरुवात झाली? रोज खा एक टेस्टी-हेल्दी तीळ आणि गूळाचा लाडू, शरिराला मिळेल एनर्जी

Shruti Vilas Kadam

आवश्यक साहित्य जमा करा

तीळ आणि गुळाचे लाडू बनवण्यासाठी एक वाटी पांढरे तीळ, अर्धी वाटी किसलेला गूळ, दोन चमचे तूप, अर्धा चमचा वेलची पूड आणि आवडीनुसार चिरलेले बदाम किंवा शेंगदाणे घ्या.

Til Ladoo | yandex

तीळ व्यवस्थित भाजून घ्या

सर्वप्रथम कढई गरम करून त्यामध्ये तीळ घाला. मंद आचेवर तीळ हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. तीळ सतत हलवत राहा, जेणेकरून ते जळणार नाहीत. तीळ भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवा.

Til Ladoo | yandex

गुळाचा पाक तयार करा

आता कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करा. त्यामध्ये किसलेला गूळ घालून मंद आचेवर वितळवून घ्या. गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर त्याचा घट्ट पाक तयार करा. पाकाची योग्य घट्टपणा तपासण्यासाठी थोडा पाक थंड पाण्यात टाकून पाहा.

Til Ladoo

पाकामध्ये तीळ मिसळा

गुळाचा पाक तयार झाल्यानंतर त्यामध्ये भाजलेले तीळ घाला. त्यानंतर वेलची पूड आणि आवडीनुसार बदाम किंवा शेंगदाण्याचे काप घाला. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिश्रण हलवत राहा.

Til Gul Ladoo | yandex

मिश्रण थोडे थंड होऊ द्या

गूळ आणि तिळाचे मिश्रण तयार झाल्यानंतर गॅस बंद करा. मिश्रण थोडे कोमट होऊ द्या. मात्र, ते पूर्णपणे थंड होऊ देऊ नका. मिश्रण गरम असतानाच लाडू वळणे सोपे जाते.

Til Ladoo Recipe | Saam TV

गोलाकार लाडू तयार करा

आता हाताला थोडे तूप लावा. तयार मिश्रणाचा छोटा भाग घेऊन हाताच्या मदतीने गोलाकार लाडू वळा. अशाच प्रकारे सर्व मिश्रणाचे लाडू तयार करून एका ताटात ठेवा.

Til Gud Ladoo

स्वादिष्ट तीळ-गुळाचे लाडू तयार!

तुमचे कुरकुरीत आणि चविष्ट तीळ-गुळाचे लाडू तयार आहेत. हे लाडू पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात साठवून ठेवा. हिवाळ्यात सकाळी किंवा संध्याकाळी खाण्यासाठी हे उत्तम आहेत.

Til Gud Ladoo

White cloths Innerwear: महिलांनी पांढरे कपडे घालताना चुकूनही घालू नका पांढरे अंतर्वस्त्र! त्याऐवजी ट्राय करा 'हे' खास रंग

White cloths Innerwear
येथे क्लिक करा