महाशिवरात्रीचा सण हा लवकरच साजरा केला जाईल. यंदा महाशिवरात्रीचा सण ८ मार्चला साजरा केला जाणार आहे. त्यामुळे अनेक भक्तगण यादिवशी उपवास करतात. तसेच काहीजण शंकराच्या मंदिराचे दर्शन देखील घेतात.
जर तुम्ही यंदाच्या महाशिवरात्रीला (Mahashivratri) शंकराचे दर्शन घेणार असाल तर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे सोमनाथ मंदिराचे (Temple) दर्शन आपण घेऊ शकतो. हे मंदिर गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील वेरावळ जवळ प्रभास पाटण येथे समुद्रकिनाऱ्यालगत आहे
या मंदिराला सोमनाथ मंदिर किंवा देव पाटण मंदिर म्हणूनही ओळखले जाते. शिवरात्री, नागपंचमी, सोमवार, श्रावण महिनासारख्या प्रमुख हिंदू सणांच्या दिवशी भाविकांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. जर तुम्ही देखील यंदाच्या शिवरात्रीला शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सोमनाथ मंदिराचे दर्शन घेणार असाल तर जाणून घ्या खर्च (Price) किती येईल.
तुम्ही सोमनाथ मंदिराला भेट देण्यासाठी रस्ता, ट्रेन आणि विमानाने सहज पोहोचू शकता. जर तुम्ही मुंबईवरुन सोमनाथ मंदिराचे दर्शन घेणार असाल तर तुम्हाला अहमदाबाद जंक्शनसाठी ट्रेनने जावे लागेल त्यानंतर सोमनाथला जाण्यासाठी बसने जावे लागते. तसचे फ्लाइटचा विचार करत असाल तर राजकोट विमानतळावर उतरुन कॅब करुन जावे लागते. कॅबने या ठिकाणी पोहचण्यासाठी तुम्हाला साधरणत: ५ तासांपेक्षा जास्तीचा वेळ लागेल.
गुजरातमधील अहमदाबाद आणि वडोरासारख्या ठिकाणाहून सोमनाथ मंदिराकडे जाण्यासाठी अनेक बसेस जातात. या ठिकाणी लक्झरी बसेस, नॉन-एसी आणि एसी बसेस उपलब्ध आहेत. तुम्ही बजेटनुसार प्रवास करु शकता.
सोमनाथ मंदिराच्या जवळचे विमानतळ हे दीव आहे. परंतु, मुंबईहून जात असाल तर राजकोट विमानतळावर उतरावे लागेल. विमानाचा खर्च साधरणत: तुम्हाला ३५०० रुपयांपर्यंत येईल. त्यानंतर कॅब करुन जावे लागेल.
सोमनाथ मंदिराच्या आजूबाजूला फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. येथे तुम्ही सुरज मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर, त्रिनेणी घाट, भालका तीर्थ, सोमनाथ बीच, पंच पांडव गुफा इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकता.
सोमनाथ मंदिराजवळ अनेक धर्मशाळा आहेत. तसेच बजेटमधील हॉटेल देखील आहे. सोमनाथ ट्रस्ट तर्फे राहाण्याची आणि खाण्याची सोय देखील करण्यात येते.
सोमनाथ मंदिर हे सकाळी ६ वाजता उघडते तर आरतीची वेळ सकाळी सात वाजता. संध्याकाळी हे मंदिर ९. ३० वाजता बंद होते तर आरतीची वेळ ही सायंकाळी ७ वाजताची आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.