Mahashivratri 2024, Mahashivratri 2024 Date, Puja time Saam Tv
लाईफस्टाईल

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला भोलेनाथला प्रसन्न करण्यासाठी शुभ मुहूर्त कधी? जाणून घ्या पूजा-विधी, उपाय

Mahashivratri 2024 Date : महाशिवरात्रीचा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो. यंदा हा सण ८ मार्चला साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेकजण उपवास करतात. तसेच मनोभावे प्रार्थना करतात.

कोमल दामुद्रे

Mahashivratri 2024 Puja Time :

महाशिवरात्रीचा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो. यंदा हा सण ८ मार्चला साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेकजण उपवास करतात. तसेच मनोभावे प्रार्थना करतात.

असे म्हटले जाते की, या दिवशी भगवान शंकर (lord Shiva) आणि देवी पार्वतीचा विवाह संपन्न झाला होता. यंदाचा शिवरात्री हा सण शिवप्रदोष आणि शिवयोगाच्या शुभ संयोगाने साजरा (Celebrate) केला जाणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीला (Mahashivratri) भगवान शंकराची विधीपूर्वक पूजा केल्याने भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करण्याचा मुहूर्त, विधी आणि उपाय.

1. महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार ८ मार्च रोजी रात्री ९.५८ वाजल्यापासून भगवान शंकराच्या जलाभिषेकाला सुरुवात होईल. शुभ आणि अमृत काळात पूजा केल्याने सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतील. या दिवशी मध्यरात्री पूजा आणि व्रत केल्याने शुभ फल मिळते अशी मान्यता आहे.

2. पूजा विधी

शास्त्रानुसार ८ मार्चच्या मध्यरात्री भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी गंगाजल, दूध किंवा उसाच्या रसाने अभिषेक करणे चांगले मानले जाते. मनोकामना पूर्ण करण्यासाठी पूजेत बेलपत्र, भांग, धतुरा आणि शमीची फुले, कणेर, फळे आणि मिठाई अर्पण करा. शंकराला प्रसन्न करण्यासाठी निळ्या, पिवळ्या आणि पांढऱ्या फुलांसोबत तीळ अर्पण करा.

3. उपाय काय कराल?

जर तुमच्या कुंडलीत कालसर्प किंवा राहू दोष असेल तर महाशिवरात्रीला चांदी किंवा तांब्याच्या नागाची जोडी अर्पण करा. तसेच शक्य असल्यास शिव रुद्राभिषेक करावा.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Election : "आमचं ठरलंय! कमळाऐवजी कपाट चिन्ह..." केडीएमसी निवडणुकीत सोशल मीडियावर खोडसाळ प्रचार, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Crime: शरीरसंबंध ठेवण्यासाठी खिडकीतून घरात घुसला, विरोध केल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT