Maharashtra Police Bharti 2024, Maharashtra Police Bharti 2024 Apply Online
Maharashtra Police Bharti 2024, Maharashtra Police Bharti 2024 Apply Online Saam Tv
लाईफस्टाईल

Maharashtra Police Bharti 2024: सुवर्णसंधी! महाराष्ट्र राज्यात पोलीस दलासाठी बंपर भरती, १७,४७१ जागा रिक्त; अर्ज कसा कराल?

कोमल दामुद्रे

Maharashtra Police Bharti 2024 Online Application Process:

पदवी उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दरात बंपर भरती सुरु आहे. यामध्ये विविध पदांवर १७४७१ जागांवर भरती प्रक्रिया सुरु आहे.

इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन (Online) अर्ज करु शकता. त्यासाठी अर्जदारांना mahapolice.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावा लागेल. या भरतीसाठी मुदत वाढवण्यात आली आहे. १५ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

1. अर्ज करण्याची तारीख

  • अर्ज प्रक्रिया तारीख - ५ मार्च २०२४

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ एप्रिल २०२४

  • रिक्त पदांची संख्या - १७४७१

2. रिक्त पदे

महाराष्ट्र राज्य पोलिस (Police) दलात शिपाई, पोलिस शिपाई चालक, सशस्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई आणि बॅन्डसमन या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

3. वयोमर्यादा

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात भरतीसाठी अर्ज (Application) करण्याऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २८ या दरम्यान असायला हवे. तसेच यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

4. अर्जाची फी किती?

जर तुम्ही पोलिस भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणार असाल तर ४५० रुपये शुल्क भरावे लागतील. तर मागासवर्गातील उमेदवाराला अर्ज शुल्कांमध्ये १०० रुपयांची सूट मिळणार आहे.

5. शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र राज्य पोलिस दलात भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण हे बारावी उत्तीर्ण किंवा पदवी उत्तीर्ण असायला हवे.

6. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पदभरती होणार?

ठाणे, पिंपरी-चिंचवड, मिरा-भाईंदर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, अमरावती, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लोहमार्ग-मुंबई, ठाणे ग्रामीण, रायगड, पालघर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, सोलापूर ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, लोहमार्ग-पुणे, लोहमार्ग औरंगाबाद. या राज्यात विविध पदांवर भरती केली जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Voting Live: प. बंगालमध्ये उच्चांकी ७३ टक्के मतदान, महाराष्ट्रात फक्त ४८.६६ टक्के

Devendra Fadnavis: सर्वात आधी आम्हीच EC कडे तक्रार केली, उद्धव ठाकरेंचे नेहमीचेच रडगाणे: देवेंद्र फडणवीस

Weightloss Tips: एका आठवड्यात किती किलो वजन कमी करावे?

Maharashtra Rain News : वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; कोल्हापुरात कारवर कोसळलं भलं मोठं झाड, कारचा झाला चुराडा

Ruchira Jadhav: सुपर हॉट रुचिरा; कहर लूकने उडवली झोप!

SCROLL FOR NEXT