New Year Diet Plan google
लाईफस्टाईल

New Year Diet Plan : नवीन वर्षाची सुरूवात करा हेल्दी, घरगुती डाएट प्लान फॉलो करून राहा फिट

Healthy Eating Resolutions : नवे वर्ष सुरू झाले आहे. नव्या वर्षात योग्य आहार ठेवणे आणि फिट राहणे हे एक उत्तम ध्येय आहे.

Saam Tv

नवे वर्ष सुरू झाले आहे. नव्या वर्षात योग्य आहार ठेवणे आणि फिट राहणे हे एक उत्तम ध्येय आहे. योग्य डाएट प्लान तयार करताना, त्यात शरीराच्या गरजा, पोषणतत्त्वांचा समावेश, आणि वजन कमी किंवा वाढवायचे असल्यावरून पदार्थांची निवड केली पाहिजे. खालील टिप्स आणि संपुर्ण डाएट प्लान तुम्ही फॉलो केलात तर तुम्ही येणारी अनेक वर्ष फीट अ‍ॅंड फाइन राहू शकाल. हा डाएट प्लान १६ ते ३५ वयोगटातील व्यक्ती फॉलो करू शकता.

1. डाएट प्लानचे उद्दिष्ट ठरवा.

वजन कमी करणे: वजन कमी करण्यासाठी तुम्ही कमी कॅलेरीज, कमी फॅट्स आणि अधिक प्रोटीन असा डाएट प्लान फॉलो केला पाहिजे.

वजन वाढवणे: वजन वाढवण्यासाठी तुम्ही अधिक कॅलेरीज, फॅट्स आणि प्रोटीन असा डाएट प्लान फॉलो केला पाहिजे.

हेल्दी राहण्यासाठी : हेल्दी राहण्यासाठी संतुलित आहार, विविध प्रकारचे पोषणतत्त्व असा डाएट प्लान फॉलो केला पाहिजे.

2. महत्वाच्या सवयी

पाणी पिणे: दिवसाला 8-10 ग्लास पाणी पिणे.

शाकाहारी/मांसाहारी: शाकाहारी किंवा मांसाहारी आहारानुसार पदार्थ निवडा.

व्यायाम: नियमित व्यायाम आणि शारीरिक सक्रियता आवश्यक आहे.

3. नव्या वर्षाचा योग्य डाएट प्लान

सकाळचा नाश्ता - उपमा, पोहे, ओट्स, फळं, ड्रायफ्रूट्स, शहाळं, चहा किंवा कॉफी (कमी साखर) कमी प्रमाणात.

लहान नाश्ता - सफरचंद, केळी, पेरू, मोसंबी, नट्स, तिळ, छास इ.

मध्य आहार - बाजरी किंवा ज्वारी भाकरी, कोबी, शिमला मिर्ची, गाजर, पनीर, ओले चणे, मटकी, मूग इ.

संध्याकाळचे स्नॅक्स - भाजलेले चणे, ताज्या फळांचा रस

रात्रीचा आहार - चपाती आणि भाजी टोमॅटो सूप, मॅश्रुम किंवा गाजर सूप, भात, मच्छी/चिकन या प्रकारचे डाएट तुम्ही किमान महिना भर फॉलो केले तर तुम्हाला लगेचच फरक जाणवू शकतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Written By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT