Parenting Tips For 2025 : नव्या वर्षात मुलांना शिकवा या ४ सवयी; भविष्यासाठी ठरेल फायदेशीर

Top 5 Parenting Resolutions : मुलांच वय जेव्हा १४ होतं तेव्हा पासून मुलांना सगळ्या गोष्टी समजायला लागतात. या वयात पालक मुलांना वेगवेगळ्या क्षेत्राची नोंद घ्यायला लावतात.
नव्या वर्षात मुलांना शिकवा या ४ सवयी; भविष्यासाठी ठरेल फायदेशीर
Parenting Tips For 2025 google
Published On

प्रत्येक जण यशस्वी होण्याचं मुख्य कारण असतं त्यांना मिळणारं योग्य मार्गदर्शन असतं. जेव्हा मुलं यशस्वी होण्यासाठी मेहनत करत असतात. त्यावेळेस आई-वडिलांची जबाबदारी प्रचंड वाढलेली असते. जेव्हा आई-वडील मुलांना योग्य वेळेस योग्य निर्णय घ्यायला शिकवतात तेव्हाच मुलं आयुष्यात एक चांगली व्यक्ती आणि कतृत्ववान होतात असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे पालकांनी योग्य वेळेत आणि योग्य वयात काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत.

मुलांच वय जेव्हा १४ होतं तेव्हा पासून मुलांना सगळ्या गोष्टी समजायला लागतात. या वयात पालक मुलांना वेगवेगळ्या क्षेत्राची नोंद घ्यायला लावतात. मग त्यांना त्याचे प्राथमिक शिक्षण देण्यासाठी लहान वयातच सुरुवात करतात. अशा तऱ्हेने मुलं पुढे जाऊन त्यांचं भविष्य घडवतात. याच बरोबर जीवनात मुलांना आणखी काही गोष्टी शिकवणं महत्वाचं आहे. तसेच येणाऱ्या नवीन वर्षात मुलांना पुढील सवयी खूप फायद्याच्या ठरतील.

नव्या वर्षात मुलांना शिकवा या ४ सवयी; भविष्यासाठी ठरेल फायदेशीर
Marathi New Year wishes 2025 : ऐन वेळी मेसेजेस शोधत बसू नका, तुमच्या मित्रांना पाठवा नववर्षाच्या 'या' हटके शुभेच्छा, वाचा खास मराठी Wishes

महत्वाच्या टिप्स

१. वाढत्या वयाच्या मुलांना यशस्वी होणं म्हणजे काय? हे आधी समजावून सांगा. मग त्यात कोणतं क्षेत्र निवडायचं हे त्यांना सांगा आणि त्यासाठी मुलांना काय मेहनत घ्यावी लागेल याचा आढावा द्या. यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मुलांना त्या विषयाची आवड आहे का? हे विचारा.

२. मुलांना कोणत्याच गोष्टी सोबत कंपेअर करायला शिकवू नका. जर त्यांनी कोणाची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा स्वभाव बदलतो. त्याने त्यांची आवड फक्त स्पर्धे पुर्ती मर्यादीत होते.

३. जर तुम्ही मुलांना त्यांच्या चुका झाल्यास ओरडत असाल तर त्यातून त्यांना कधीच फायदा होणार नाही. तुम्ही त्यांना शिकवले पाहिजे की, चुकांमधून अनेक महत्वाच्या गोष्टी शिकता येतात. तसेच भविष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरं जाता येतं.

४. लहान मुलांची संगत ही त्यांना आयुष्यात पुढे घेऊन जाण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे त्यांना शिकवा की, कमी मित्र असले तरी चांगले मित्र निवडा. त्यात ते हुशारचं असावेत असं नाही. त्यांना तुम्ही हुशार सुद्धा करू शकता. अशी समजूत मुलांची करून त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या.

नव्या वर्षात मुलांना शिकवा या ४ सवयी; भविष्यासाठी ठरेल फायदेशीर
Malaika Arora Diet : फीटनेस फ्रीक मलायका आरोराही खाते 'हा' ठेचा; तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com