
आता २०२४ वर्ष काहीच तासात संपणार आहे. या चालू वर्षात सर्वजणांनी चढउतारांचा अनुभव घेतला. या वर्षात सर्वजणांनी अनेक वेगवेगळे अनुभव घेतले आहेत. तसेच जे काही संकल्प ठरवले होते ते या वर्षी पुर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने खूप मेहनत घेतली असावी. आता येणाऱ्या वर्षात असेच नवे संकल्प ठरवून आपण यश मिळवलं पाहिजे. तसेच आपल्या जवळच्या व्यक्तींनीही मेहनत घेत यश मिळवलं पाहिजे यासाठी त्यांना नविन वर्षाच्या सुंदर शुभेच्छा आपण दिल्या पाहिजेत. असेच काही संदेश पुढील प्रमाणे आहेत.
1. एक नवीन सौंदर्य,
एक नवीन स्वप्न,
एक विश्वास, एक आस्था
एक चांगला विचार.
हीच आहे चांगल्या नवीन वर्षाची सुरुवात.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
2. २०२५ हे येणारे नवेवर्ष
तुमच्या जीवनात सुख
आणि समाधान घेऊन येवो.
हे नवीन वर्ष आपणास
भरभराटीचे जावो.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
3. सरत्या वर्षाला निरोप देत,
नवी स्वप्न, नव्या आशा,
नव्या उमेदी आणि
नाविन्याची कास धरत
करू नवीन वर्षाचे स्वागत.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
4. नव्या वर्षाच्या सुरुवातीला
नवीन नाती जपूया,
नव्या धोरण्यांच्या चरणी
एकदा तरी आपले
मस्तक झुकवूया
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
5. गेलेल्या वर्षासोबत आपणही विसरू हेवेदावे,
नव्या वर्षाच्या उत्साहात जमुया आपण सारे,
नववर्षाभिनंदन!
6. हे नातं सदैव असंच राहो,
मनात आठवणींचे दिवे
कायम राहो,
खूप प्रेमळ होता
२०२४ चा प्रवास,
अशीच राहो आपली
नवीन वर्षी साथ.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
7. पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवे क्षितीजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा.
8 . 2024 मध्ये माझ्या सुख-दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे बरं…
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा बरं…
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या
एवढंचं म्हणणं मांडतो बरं
आपणास व आपल्या परिवाराला 2025 या येणाऱ्या नवीन वर्षाच्या कोटी कोटी शुभेच्छा !
Written By : Sakshi Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.