low blood pressure symptoms google
लाईफस्टाईल

Low Blood Pressure: उभं राहताना किंवा उठताना अचानक चक्कर येते? BPच्या रुग्णांनी वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितलं महत्वाचं कारण

Summer Health: उभं राहताना अचानक चक्कर येणं हे लो बीपी, डिहायड्रेशन किंवा रक्तप्रवाह कमी झाल्याचं लक्षण असू शकतं. डॉक्टरांच्या मते, वारंवार होत असल्यास दुर्लक्ष न करता योग्य उपचार घ्या.

Sakshi Sunil Jadhav

सध्या उन्हाळा प्रचंड वाढत चालला आहे. या दिवसात घराबाहेर पडणं जर कठीणच वाटतं. कारण त्याने खूप जास्त घाम येतो, चिडचिड होते, थोडं चालल्यावर दम लागतो. त्यामुळे अनेकांना जास्तीचा त्रास सहन करावा लागतो. उन्हामुळे कधीकधी अचानक चक्करसुद्धा येऊ शकते. अचानक उभं राहताना डोळ्यासमोर अंधार येतो, डोकं हलकं वाटतं आणि काही वेळासाठी सगळं फिरत असल्यासारखं वाटत. ही लक्षण फक्त उन्हामुळेच नाही तर तुम्हाला इतर जीवघेण्या आजारांमुळेही होऊ शकतात. पुढील बातमीत आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, चक्कर येणं हे फक्त उन्हाचं नाही तर ब्लड प्रेशर, रक्तप्रवाह आणि शरीरात असणारी पाण्याची कमतरता याची चिन्ह किंवा संकेत असतात. यामध्ये अनेकांना बसल्या जागेवर उठल्यावर लगेचच चक्कर येते. विशेषत जे रुग्ण ब्लड प्रेशरचे आहेत. त्यांना या लक्षणांना फक्त उन्हाळ्यामध्येच नाही तर इतर वेळेस सुद्धा सामोरं जावं लागतं. यावर डॉक्टरांनी उत्तम प्रकारे तुमची चूक सांगितले आहे. कारण जीवनशैलीतल्या बदलांमुळे तुमच्या हार्टवर नेहमीच परिणाम होतो.

जेव्हा तुम्ही Dr Ashish Agarwal यांनी msn वेबसाईटने प्रसारिक केलेल्या वृतात असे सांगितले आहे की, बसलेल्या अवस्थेतून उभं राहताना रक्तदाबात तात्पुरता कमी होतो. गुरुत्वाकर्षणामुळे रक्त पायांपर्यंत सरकतो आणि मेंदूकडे जाणारा प्रवाह काही वेळासाठी कमी होतो. जेव्हा शरीर याला प्रतिसाद देत नाही, तेव्हा काही वेळासाठी डोकं हलकं वाटू शकतं. कधीकधी होणारी ही समस्या गंभीर नसली तरी ती वारंवार होत असेल, तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी उन्हाळ्यात जास्त प्रमाणात पाणी पित राहिलं पाहिजे, वेळेवर जेवण केलं पाहिजे. तसेच थकवा, कमी झोप किंवा उन्हामध्ये जास्त वेळ न राहता तुम्ही सुरक्षित राहीलं पाहिजे.

काही वेळा कमी रक्तदाब असणं नॉर्मल असतो, पण उभं राहताना तो खूपच कमी झाला, तर मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा तात्पुरता थांबू शकतो. त्यानेही डोळ्यासमोर अंधार येतो, धूसर दिसतं आणि बेशुद्ध पडण्यासारखी लक्षणं दिसू शकतात. म्हाताऱ्यांमध्ये किंवा वृद्धांमध्ये आधीपासून काही आजार असलेल्या लोकांमध्ये ही लक्षणं जास्त गंभीर ठरू शकतात. त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्यांनी उठताना किंवा बसताना घाई करणं टाळलं पाहिजे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी डेब्यू कधी करणार? आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही नाही मिळाली संधी

धारशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट, पवनराजेंची हत्या, संजय राऊतांचा ओमराजे निंबाळकरांवर वेगळाच संशय

Maharashtra News Live Update: निफाड तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी शेतकरी सुखावला

Dombivli Crime: तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण, संतप्त नागरिकांनी धडा शिकवला; डोंबिवलीतील संतापजनक घटना

LPG Rule Change: १ जुलैपासून एलपीजीच्या नियमात होणार मोठा बदल, या ग्राहकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

SCROLL FOR NEXT