Breakup Glow-Up: Revenge dressing boosts confidence and emotional strength after heartbreak. saam tv
लाईफस्टाईल

Love Breakup: ब्रेकअपनंतर मुली अचानक हॉट का दिसू लागतात? काय आहे 'रिव्हेंज ड्रेसिंग?

Revenge Dressing Trend: ब्रेकअपनंतर महिला अचानक हॉट का दिसतात? 'रिव्हेंज ड्रेसिंग' काय आहे , हे जाणून घेऊ. प्रेमात अपयश आल्यानंतर किंवा प्रियकर सोडून गेल्यानंतर मुली अधिक सुंदर आणि आत्मविश्वासू का वाटतात. त्यांची ड्रेसिंग स्टाइल का अधिक सुधारते ते जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • ब्रेकअपनंतरचा ‘ग्लो-अप’ हा नैसर्गिक मानसिक बदल असतो

  • रिव्हेंज ड्रेसिंगमुळे आत्मविश्वास वाढतो

  • आवडते कपडे घालणं ही भावनिक उपचार प्रक्रिया आहे.

नवीन हेअरकट, स्लिट स्कर्ट, टॉप ब्रेकअपनंतर तुमच्याही एक्सचा लूक अचानक बदलला आहे का? तिच्या नवीन लूकवरून आणि स्माइलवरून तुमची नजर हटत नाहीये का? ब्रेकअपनंतरही तुमची एक्स गर्लफ्रेंड झक्कास दिसतेय? तिच्या अशा वागण्यानं तुम्ही आवाक होणं साहजिक आहे. ब्रेकअपनंतरही नैराश्यात न जाता ती इतकी खूश का असा विचार करत असाल तर हे रिव्हेंज ड्रेसिंग सायकोलॉजी ( बदला मानसशास्त्र ) आहे. ब्रेकअपच्या दु:खावर मात करण्यासाठी ही एक उपचार प्रक्रिया आहे.

यात एखादी व्यक्ती ब्रेकअपनंतर त्यांचे आवडते कपडे परिधान करते. याचा थेट परिणाम त्यांच्या विचारसरणीवर, भावनांवर आणि कामगिरीवर होत असतो. मानसशास्त्रीय भाषेत या संकल्पनेला संलग्न ज्ञान (एनक्लोथ्ड कॉग्निशन ) म्हणतात.

ब्रेकअपचा सर्वात जास्त परिणाम व्यक्तीच्या आत्मविश्वासावर होतो. अशा परिस्थितीत जीवनशैलीकडे लक्ष नसते. एनक्लोथ्ड कॉग्निशनमुळे आपल्या अंगावरच्या कपड्यांचा प्रभाव आपल्या मेंदूवर आणि वर्तनावर पडत होत असतो. ब्रेकअपनंतर जेव्हा कोणी व्यक्ती 'रिव्हेंज ड्रेसिंग करते तर त्या दुःखी होण्याऐवजी स्टायलिश कपडे घालू लागतात. यामुळे व्यक्ती नैराश्यात न राहता 'पॉवर मोड'मध्ये प्रवेश करतो. त्यावेळी त्यांचा आत्मविश्वास आकर्षक आणि मजबूत वाटू लागतो.

१९९४ मध्ये ब्रिटनच्या तत्कालीन राजकुमारी डायनाने रिव्हेंज ड्रेसिंगचे सर्वात उत्कृष्ट उदाहरण आहे. जेव्हा तिचे पती, प्रिन्स चार्ल्स यांनी एका टीव्ही मुलाखतीत प्रेमसंबंधाची कबुली दिली होती. ज्या रात्री पती प्रिन्स चार्ल्सने त्यांच्या प्रेमसंबंधाची कबुली दिली त्याच रात्री राजकुमारी डायनाने ऑफ-शोल्डर ब्लॅक ड्रेस घातला होता. इतके मोठे दुःख असूनही ती या ड्रेसमध्ये मजबूत आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेल्याच्या दिसत होत्या.

रिव्हेंज ड्रेसिंग म्हणजे हे फक्त इतरांना दुखावण्याबद्दल नाही तर ते स्वतःला दु:खातून सावरण्यासाठी महत्त्वाचे आहे. रिव्हेंज ड्रेसिंगमागे अनेक वैज्ञानिक कारणे आहेत:

आत्मविश्वास वाढवणे:

जेव्हा रिव्हेंज ड्रेसिंगमुळे तुम्ही चांगले दिसता तेव्हा तुम्हाला असे वाटते की नातेसंबंध संपल्यामुळे तुमचे मूल्य कमी झालेले नाही, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो.

हार्मोनल बदल:

संशोधनातून असे दिसून आले आहे की जेव्हा आपण आरशात स्वतःला पसंत करू लागतो तेव्हा आपले शरीर डोपामाइन, आनंदी संप्रेरक सोडते आणि कॉर्टिसोल, तणाव संप्रेरक, ची पातळी कमी होते.

मानसिक बदल:

नवीन केस कापण्याची पद्धत किंवा शैली ही जुन्या वेदना आणि आठवणी विसरून मानसिक बदल करण्याचा एक मार्ग असते.

स्वतःवर प्रेम करणं:

लोक अनेकदा याला ढोंग समजतात. परंतु स्वतःवर प्रेम करण्याची ही प्रक्रिया आहे. रिव्हेंज ड्रेसिंगमधून एखादी व्यक्ती समाजाला आणि स्वतःला संदेश देते की त्या खचलेल्या नाहीत. त्या नैराश्यात नाहीत. त्यामुळे चांगल्या जीवनशैलीमुळे आणि ड्रेसिंगमुळे तुमची मानसिक स्थिती बदलण्याचा आणि नवीन धैर्याने जगाला सामोरे जाण्यास शक्ती मिळते.

Disclaimer: प्रिय वाचकांनो, ही बातमी वाचल्याबद्दल धन्यवाद. ही बातमी फक्त माहितीसाठी आहे. साम टीव्ही या माहितीला दुजोरा देत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Evening Snack Recipe : संध्याकाळी नाश्त्याला बनवा चटपटीत 5 पदार्थ

Maharashtra Live News Update: एक केस झाली म्हणून गप्प बसणारा नाही; मंत्री भरत गोगावले यांचा पुत्र विकास गोगावले यांच मोठ विधान

Long Mangalsutra Design: लग्नसराई किंवा फंक्शनसाठी ट्राय करा 'हे' ट्रेडिंग सुंदर मोठे मंगळसूत्र

Kolkata Nazirabad Fire: नझीराबादेतील एका गोदामाला भीषण आग; बंद गोडाऊनमध्ये अडकले मजूर, ७ जणांचा मृत्यू

Anjali Arora Boyfriend: एक गंभीर आरोप आणि अटक; 'कच्चा बदाम' फेम अंजली अरोराच्या बॉयफ्रेंड पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT