Weight Loss Tips Saam TV
लाईफस्टाईल

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय, पण आळशीपणा सुटत नाही, मग 'या' सोप्या उपायांनी विना मेहनत व्हा हेल्दी

या उपायांद्वारे तुम्ही कष्ट न करता सहज वजन कमी करू शकता.

वृत्तसंस्था

मुंबई: वजन कमी करणे हे अत्यंत कठीण असते. लोक वेगवेगळ्या पद्धतीने वजन कमी करण्याचे प्रयत्न करत असतात. कोणी डायट करतं, कोणी जिममध्ये व्यायाम करतं. पण तरीही अनेक प्रयत्न करुनही कधीकधी वजन कमी होत नाही. पण, हे तर झालं मेहनती, उत्साही व्यक्तींबाबत. जर तुम्ही खूप आळशी असाल आणि वजन कमी करु इच्छित असाल तर तुमच्यासाठीही काही सोपे मार्ग आम्ही घेऊन आलो आहेत (Lose weight with these easy tips do these things before bed).

या उपायांद्वारे तुम्ही कष्ट न करता सहज वजन कमी (Weight Loss) करू शकता. यासाठी तुम्हाला झोपण्यापूर्वी काही गोष्टी कराव्या लागतील. जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आळशी (Lazy) लोकांनी झोपण्यापूर्वी कराव्यात.

न पांघरता झोपण्याचा प्रयत्न करा

आपल्याला ब्लँकेटशिवाय किंवा काहीही न पांघरता झोपण्याचा (Sleep) प्रयत्न करावा लागेल. असे मानले जाते की जेव्हा तुम्ही थंड तापमानात झोपता तेव्हा तुमचे मेटबॉलिज्म वाढते. असे मानले जाते की रात्रीच्या वेळी थंडीमुळे आपल्या शरीरातील हेल्दी ब्राउन फॅटचे प्रमाण वाढते, ज्यामुळे शरीराला अतिरिक्त रक्तातील साखरेपासून मुक्त होण्यास आणि अधिक कॅलरीज बर्न करण्यास मदत होते. त्यामुळे ब्लँकेटशिवाय झोपण्याचा प्रयत्न करा.

रात्री एक तास अधिकची झोप घ्या

याशिवाय, असे मानले जाते की जर तुम्ही रात्री एक तास अधिकची झोप घेतली तर तुमचे वजन कमी करण्यास मदत होते. जास्तकरुन रोगांचा उपचार आपल्या योग्य आणि पूर्ण झोपेने होतो. म्हणजेच अधिकाधिक झोप घेतल्याने वजन कमी करण्यासोबतच मानसिक शांतीही मिळते.

स्लीप मास्क घालून झोपा

स्लीप मास्क घालण्याचा वजन कमी करण्याशीही संबंध आहे. असे मानले जाते की जे लोक कमी प्रकाशात झोपतात त्यांच्यात लठ्ठ होण्याची शक्यता 21 टक्के असते. अशा परिस्थितीत प्रकाशात झोपणाऱ्या लोकांनी नेहमी स्लीप मास्क घालून झोपावे.

झोपायच्या आधी प्रोटीन शेक प्या

झोपायच्या आधी प्रोटीन शेक (Protein Shake) प्यायले तर तुम्हाला अनेक मोठे फायदे होतील. प्रोटीन कार्ब्स किंवा चरबीपेक्षा जास्त थर्मोजेनिक असल्याचे मानले जाते. ते पचवण्यासाठी आपल्या शरीरातील अधिक कॅलरी बर्न करण्यास कारणीभूत ठरते.

(टीप- वरील कुठलाही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे गटाचे 3 उमेदवार आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT