Skin Care Tips For Men: उन्हाळ्यात पुरुषांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी?

महिला त्यांच्या त्वचेची भरपूर काळजी घेत असतात. स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनीही त्यांच्या त्वचेची पुरेशी काळजी घेतली पाहिजे. महिला आणि पुरुषांची त्वचा वेगळी असते.
Skin Care Tips For Men in Summer
Skin Care Tips For Men in SummerSaam Tv
Published On

महिला त्यांच्या त्वचेची भरपूर काळजी घेत असतात. स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनीही त्यांच्या त्वचेची पुरेशी काळजी घेतली पाहिजे. महिला आणि पुरुषांची त्वचा वेगळी असते. उन्हाळाच्या दिवसात दोघांनाही वेगवेगळ्या प्रकारे त्वचेची काळजी घेण्याची गरज असते. अनेक वेळा त्वचेची काळजी न घेतल्याने पुरुषांना डाग, पुरळ, काळे डोके, सुरकुत्या अश्या समस्यांना सामोरे जावे लागते. जर पुरुष काही स्किनकेअर टिप्स शोधत असतील तर ते या टिप्स फॉलो करू शकतील. यामुळे त्यांना त्यांचा चेहरा आकर्षक आणि चमकदार होण्यास मदत होईल. (Skin Care Tips For Men in Summer)

Cleansing
CleansingSaam Tv

त्वचा साफ करणे;

त्वचा स्वच्छ (Cleansing) करणे हा स्किनकेअर रूटीनचा सर्वात महत्वाचा भाग आहे. यामुळे दिवसभरानंतर त्वचेवर साचलेली घाण काढून टाकण्यास मदत होते. दिवसभराच्या साचलेल्या धुळीमुळे, घामामुळे तुमच्या त्वचेला खूप स्वच्छतेची गरज असते. यामुळे रोजच्या फेसवॉश सोबतच तुम्ही तुमची त्वचा आठवड्यातून एकदा चांगल्या स्क्रबने एक्सफोलिएट करावी.

Shaving
ShavingSaam Tv

शेविंग टिप्स;

पुरुषांची त्वचा आणि महिलांची त्वचा यातील मुख्य फरक म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरील केस. पुरुषांना चेहऱ्यावरील केसांची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे शेव्हिंग करण्यापूर्वी शेव्हिंग जेल वापरा. हे तुमच्या चेहऱ्यावरील केसांना साबणापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे मऊ करते. तुमच्या त्वचेला थोडा ओलावा देण्यासाठी आफ्टरशेव्ह करायला विसरू नका. अल्कोहोल-आधारित आफ्टरशेव्ह टाळा कारण ते तुमचा रेझर बर्न खराब करू शकतात.

Sunscreen
SunscreenSaam Tv

सनस्क्रीन लावा;

सनस्क्रीन हे सर्वात सामान्य स्किनकेअर उत्पादनांपैकी एक आहे. तुमच्या त्वचेला UV किरणांपासून वाचवण्यासाठी तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता. उन्हात बाहेर जाण्यापूर्वी चेहरा आणि मानेवर सनस्क्रीन लावण्याची खात्री करा. हे हानिकारक UV किरणांपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी मदत करेल.

Men Skincare Products
Men Skincare ProductsSaam Tv

आपल्या त्वचेनुसार स्किनकेयर प्रोडक्ट्स निवडा

बहुतेक पुरुष आपल्या स्किनकेअर प्रॉडक्ट्सबद्दल अधिक विचार करत नाहीत. यामुळे त्वचा संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्वचेच्या समस्या जसे फोड आणि रेड नेस या जळजळ पासून वाचण्यासाठी डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार आणि आपल्या स्किननुसार ब्यूटी प्रोड्सची निवड करा. या टिप्स तुमची त्वचा हेल्दी बनवण्यासाठी मदत करतील. याशिवाय चांगल्या त्वचेसाठी हेल्दी आहारही आवश्यक आहे. पौष्टिक अन्न तुमच्या त्वचेला आतमधून पोषण देते. याशिवाय तुमची उजळलेली आणि ग्लोइंग त्वचा यासाठी अनेक प्रकारे होममेड फेस मास्क वापरू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com