Loneliness Saam Tv
लाईफस्टाईल

Loneliness Health Impact: एकटेपणामुळे तुम्हाला होऊ शकतात इतके आजार; पाहा कशी दिसून येतात याची लक्षणं

Is Social Isolation Dangerous For Health: एकटेपणा हा केवळ मानसिक स्थिती नसून तो शारीरिक आरोग्यावरही गंभीर परिणाम करू शकतो. तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ एकटे राहिल्यास शरीरात आणि मनात अनेक आजारांची लक्षणे दिसू लागतात.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्यापैकी अनेक जण असतात ज्यांना एकटं राहायला आवडतं. मात्र अनकेदा हे एकटेपण तुम्हाला खायला उठतं. नुकतंच चीनमध्ये एका मोबाइल अॅपचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. हे अॅप देशातील तरुणांमध्ये वाढता एकटेपणा आणि निराशेला अधोरेखित करतं. "आर यू डेड" नावाचं हे अॅप एकटं राहणाऱ्या लोकांसाठी डिझाइन कऱण्यात आलंय.

काय आहे या अॅपचा उद्देश?

या अॅपचा उद्देश अगदी सोपा आहे. दररोज अॅपवर तु्म्हाला चेक इन करावं लागणार आहे. जर सलग काही दिवस चेक-इन नसेल तर अॅप युझर्सच्या इमेरजन्सी कॉन्टॅक्टला आपोआप अलर्ट जातो. आजच्या जीवनशैलीत, एकटेपणा वेगाने वाढताना दिसतोय. अनेकदा लोक याला फक्त एक भावनिक समस्या मानतात. परंतु संशोधनातून असं दिसून आलंय की, त्याचा शरीरावर, विशेषतः हृदयावर परिणाम होतो.

सोशल आयसोलेशन काय आहे?

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, सोशल आयसोलेशन म्हणजे कुटुंब, मित्र किंवा समाजाशी कमी किंवा अजिबात संबंध नसणं. हे एकटं वेळ घालवण्यापेक्षा वेगळं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकाळ भावनिक आणि सामाजिक आधारापासून वंचित राहते तेव्हा खरा धोका उद्भवतो. ज्यावेळी एखादी व्यक्ती एकटी पडते तेव्हा शरीर त्याला स्ट्रेसची स्थिती समजतं. यामुळे कॉर्टिसोल आणि अॅड्रेनालाईन सारखे ताणाचे हार्मोन वाढतात. यामुळे तुमच्या हृदयावरही परिणाम होतो.

एकटेपणा का ठरतो धोकादायक?

एकटे राहणारे लोक शक्यतो व्यायाम करत नाहीत. कमी खातात आणि औषधांकडे दुर्लक्ष करू शकतात. एकटेपणामुळे नैराश्य आणि चिंता वाढू लागते. परिणामी हृदयाच्या आरोग्याला आणखी नुकसान होतं. आजारपण किंवा अशक्तपणाच्या वेळी प्रिय व्यक्तीचा आधार अत्यंत महत्त्वाचा असतो.

कोणत्या लोकांना असतो अधिक धोका?

एकटे राहणारे किंवा ज्यांनी जवळच्या व्यक्ती गमावल्यात अशा वृद्ध लोकांना जास्त धोका असतो. याशिवाय तरूणांनाही याचा त्रास अधिक असतो. कामाचा ताण आणि डिजिटल कम्युनिकेशमुळे एकमेकांसोबत बोलणं कमी झालंय. नातेसंबंध हे आपल्या हृदयासाठी औषधासारखं आहे. त्यामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तींशी नियमितपणे बोला, सामाजिक किंवा कम्युनिटी ग्रुपमध्ये सामील व्हा.

एकटेपणा ही केवळ मानसिक स्थिती नाही तर हृदयाच्या आरोग्यासाठी एक गंभीर धोका आहे. ज्याप्रमाणे आपण आहार, झोप आणि व्यायामाकडे लक्ष देतो, त्याचप्रमाणे नातेसंबंधांसाठी वेळ देणं देखील महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलीस कर्मचाऱ्यांना घरं मिळणार, अटल सेतूवरील प्रवास टोल फ्री; महापालिकेच्या निवडणुकीनंतर सरकाराचे एकामागून एक निर्णय

मुंबईच्या महापौरपदावरून भाजप-शिंदेसेनेत रस्सीखेच; २९ जागा जिंकलेल्या शिंदेसेनेला हवंय महापौरपद

winter blood sugar rise: थंडीच्या दिवसात ब्लड शुगर लेवल का वाढू लागते?

Nankhatai Recipe : बेकरीत मिळते तशी नानकटाई घरीच बनवा, तोंडात टाकताच आवडेल

Nagpur Tourism : नागपूरमध्ये फिरायला गेलाय? मग मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या 'या' किल्ल्याची करा सफर

SCROLL FOR NEXT