Best Foods for Strong Bones Saam
लाईफस्टाईल

उठता - बसता हाडांचा कटकट आवाज येतो? तिशीतच गुडघेदुखीनं त्रस्त; किचनमधील खा 'हा' पदार्थ, व्हाल फिट

Best Foods for Strong Bones: दूध, दही, चीज, बदाम, चिया, तीळ आणि पालेभाज्यांमुळे हाडं मजबूत होतात.

Bhagyashree Kamble

वय वाढत असताना आपली हाडे देखील कमकुवत होतात. ज्याला ऑस्टियोपोरोसिस असे म्हणतात. दरम्यान, लाईफस्टाइलमध्ये झालेले बदल, जेवणाच्या वेळेत बदल आणि पोषणाच्या कमतरतेमुळे तारूण्यातही हाडे ठिसूळ होतात. दरम्यान, हाडांना मजबूत करण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा हाडं अधिक कमकुवत होतात.

योग्य आहार घेतल्याने तुमची हाडे वृद्धापकाळातही मजबूत राहू शकतात. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध असलेले हे पाच पदार्थ नियमित खा. यामुळे हाडं निरोगी राहतील. तसेच वृद्धापकाळात गुडघेदुखीचा त्रासही सतावणार नाही.

दुग्धजन्य पदार्थ

दूध, दही आणि चीज हे कॅल्शियमचे सर्वोत्तम स्त्रोत आहेत. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स देखील असतात. जे कॅल्शियम शोषण्यास मदत करतात. तसेच हाडांना मजबूत करतात. यासाठी आपल्या आहारात नियमित दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. यामुळे आरोग्यही निरोगी राहिल.

ड्रायफ्रूट्स

बदाम, चिया सिड्स आणि तीळ हे कॅल्शियमचे उत्कृष्ट शाकाहारी स्त्रोत आहेत. बदाम आणि चिया बियांमध्ये मॅग्नेशियम असते. जे कॅल्शियम शरीरात सक्रीय करण्यास मदत करते.

हिरव्या पालेभाज्या

कोबी, ब्रोकोली आणि पालक. या पालेभाज्यांमध्ये केवळ कॅल्शियम नसून, व्हिटॅमिन के देखील आढळते. व्हिटॅमिन के देखील हाडांसाठी अत्यंत आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमधील पर्यावरणप्रेमी आणि पालिका प्रशासन यांच्यातील बैठक निष्फळ

धक्कादायक! भरधाव कारने ६ जणांना उडवलं, रस्त्यावरील श्वानालाही चिरडलं

Shocking: राजकारणात खळबळ! बड्या राजकीय नेत्याची हत्या, छातीत झाडल्या ३ गोळ्या

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून दर महिन्याला मिळणार ६१,००० रुपये

Pineapple Benefits: हिवाळ्यात अननस खाल्ल्याने होतात हे ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT