अक्षय खन्नाची 'धुरंधर' एन्ट्री, Hook step वर सगळेच फिदा; व्हायरल गाणं नेमकं कुठलं?

Akshaye Khanna’s FA9LA Song Trends Online: धुरंधरमधील अक्षय खन्नाची रहमान डकैत ही भूमिका प्रचंड व्हायरल. FA9LA गाण्याला प्रेक्षकांची पसंती. स्टायलिश ब्लॅक-सूट डान्स इंटरनेटवर ट्रेंडिंग.
Akshaye Khanna’s FA9LA Song Trends Online
Akshaye Khanna’s FA9LA Song Trends OnlineSaam
Published On

सिनेसृष्टीत सध्या 'धुरंधर'ने धुमाकूळ घातला आहे. आदित्य धर दिग्दर्शित'धुरंधर'ने केवळ मोठ्या पडद्यावरच नव्हे तर, सोशल मीडियावरही वादळ निर्माण करत आहे. चित्रपटातील अनेक दृश्ये इंटरनेटवर ट्रेडिंगमध्ये आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह मु्ख्य भूमिकेत आहे. तर, इतर दमदार कलाकारही दिसत आहे. दरम्यान, अक्षय खन्नाच्या पात्राने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे.

'धुरंधर' या चित्रपटात अक्षय खन्ना रहमान डकैत या दरोडेखोराची भूमिका साकारत आहे. त्याची भूमिका एका क्रूर खलनायाकाची आहे. भेदक नजर, खतरनाक डायलॉग्स यामुळे हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा कुणालाही होईल. अक्षय खन्नाने या चित्रपटासाठी जीव ओतून काम केलं असल्याचं दिसून येत आहे.

Akshaye Khanna’s FA9LA Song Trends Online
बेडरूममध्ये बॉयफ्रेंड अन् गर्लफ्रेंडचा रोमान्स; बायको आली अन् प्रेयसीला १०व्या मजल्यावर लटकवलं, VIDEO व्हायरल

चित्रपटात एक दृश्य आहे, जिथे अक्षय खन्ना ब्लॅक सूट घालून चारचाकीतून बाहेर येतो. तसेच बहरीनच्या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. अक्षय खन्नाचे लूक आणि स्टेप्स लक्षवेधी आहे. तसेच म्यूझिकही व्हायरल होत आहे. हा सीन सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

जेव्हापासून प्रेक्षकांनी अक्षय खन्नाचा हा सीन मोठ्या पडद्यावर पाहिला. तेव्हापासून हे गाणं आणि अक्षय खन्नाची स्टेप व्हायरल होत आहे. रहमान डकैतच्या भूमिकेला अक्षय खन्नाने खऱ्या अर्थाने न्याय दिला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचा स्वॅग, डान्स मूव्ह आणि डायलॉग्स ऐकून प्रेक्षक अक्षय खन्नाचे चाहते झाले आहेत. तसेच या गाण्याने लोकांचे मन जिंकले आहे.

Akshaye Khanna’s FA9LA Song Trends Online
धक्कादायक! एक्स्प्रेसमध्ये पाणी बिस्किट नव्हे.. दारू, गुटखा अन् अंमली पदार्थांची विक्री, VIDEO व्हायरल

व्हायरल गाणं नेमकं कुठलं?

अक्षय खन्नावर चित्रित केलेले हे गाणे बहरीनमधील असल्याची माहिती आहे. या गाण्याचे नाव 'FA9LA' असे आहे. हे व्हायरल गाणं बहरीनमधील खलीजी हिपहॉप स्टार फ्लिपराची या गायकाने गायलं आहे. धुरंधर चित्रपटात हाच ट्रॅक वापरण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com