Leap Year 2024  Saam Tv
लाईफस्टाईल

Leap Year 2024 : चार वर्षांनी येणाऱ्या लीप इअरबाबत खास गोष्टी, जाणून घ्या सविस्तर

why does February have 28 days : २०२४ मधील दुसरा महिना म्हणजे फेब्रुवारी. या महिन्यात दर चार वर्षांनी लीप वर्ष येते. या वर्षी लीप वर्ष असून २८ ऐवजी २९ दिवस आहेत. लीप वर्षामध्ये इतर वर्षांच्या तुलनेत एक दिवस जास्त असतो.

कोमल दामुद्रे

why after four years February has 29 days :

२०२४ मधील दुसरा महिना म्हणजे फेब्रुवारी. या महिन्यात दर चार वर्षांनी लीप वर्ष येते. या वर्षी लीप वर्ष असून २८ ऐवजी २९ दिवस आहेत. लीप वर्षामध्ये इतर वर्षांच्या तुलनेत एक दिवस जास्त असतो.

लीप वर्षानिमित्त गुगलने (google) देखील शास डुडल शेअर केले आहे. या डूडलच्या माध्यमातून गुगलने लीप डे एका खास पद्धतीने साजरा (Celebrate) केला आहे. लीप वर्ष म्हणजे काय? दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात एक दिवस जास्त का असतो? जाणून घेऊया कारण

1. लीप वर्ष म्हणजे काय?

चार वर्षांनी (Year) फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस येतात हे आपल्यापैकी अनेकांना माहित आहे. वर्षात साधारणपणे ३६५ दिवस असतात. पण लीप वर्ष असल्यामुळे या वर्षी ३६६ दिवस असणार आहे.

2. लीप वर्ष का असते?

पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी ३६५ दिवसांचा कालावधी लागतो. परंतु, पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यासाठी ३६५. २५ दिवसांचा काळ घेते. यामध्ये ३५६ दिवस, पाच तास, ४८ मिनिटे, ४५ सेकंद लागतात. या एका दिवसाची भरपाई करण्यासाठी प्रत्येक चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात एक दिवस जोडला जातो. त्यामुळे याला लीप वर्ष म्हणून ओळखले जाते.

असे म्हटले जाते की, ऋतू आणि कॅलेंडर यांमध्ये फरक पडू नये म्हणून दरवर्षी पडणारा पाच तासांचा फरक लीप वर्षामध्ये भरुन काढण्यात येतो. या एक दिवस फेब्रुवारी महिन्यात जोडला जातो. म्हणून हा महिना दर चार वर्षांनी २९ दिवसांचा असतो.

3. लीप वर्ष कसे ठरवाल?

ज्या वर्षाला ४ ने भागता येते. त्या वर्षाला लीप वर्ष असे म्हटले जाते. २०२० आणि २०२४ च्या या आकड्यांना ४ किंवा ४०० ने भागता येते. मात्र यापूर्वीचे १७००, १८०० या शतकातील वर्षांना लीप वर्ष मानले जाता येत नाही.

4. कोणता देश लीप वर्ष फॉलो करतो?

ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार बहुतेक देश लीप वर्ष फॉलो करतात. परंतु, जगभरात अनेक कॅलेंडर्स आहेत ज्यामध्ये लीप वर्षाचा समावेश नसतो.

5. लीप वर्षाचा वाढदिवसावर परिणाम होतो का?

लीप वर्षात सण किंवा ठराविक तारखेच्या सुट्टया लीप वर्षात बदलत नाही. परंतु, २९ फेब्रुवारी किंवा विशेषत: २८ फेब्रुवारी रोजी जन्मलेले लोक नॉन लीप वर्षांमध्ये १ मार्च रोजी वाढदिवस साजरा करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

SCROLL FOR NEXT