कोमल दामुद्रे
जर तुम्ही वयाची तिशी ओलांडली असेल तर तुम्हाला आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर हेल्दी आणि फिट राहायचे असेल तर वयाच्या तिशीत आहाराकडे लक्ष द्या.
आहारात बीन्सचा समावेश केल्यास मधुमेह आणि हृदयासंबंधित समस्यांचा धोका कमी होतो.
फायबर, प्रथिने आणि व्हिटॅमिन समृद्ध असणाऱ्या कडधान्यांचा आहारात समावेश करा.
अश्वगंधा, मोरिंगा आणि तुळशीसारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा समावेश करा. यामुळे प्रतिकारशक्ती मजबूत होईल.
दुधामध्ये आढळणारे घटक हाडांच्या समस्या टाळतात.
अक्रोडचे नियमित सेवन केल्याने फिटनेस सुधारण्यास मदत होते.
ग्रीन टी चे सेवन केल्याने बीपी, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यांसारख्या घातक आजारांपासून दूर राहाता येते.