Kotak Bank UPI Payment Message Saam Tv
लाईफस्टाईल

Kotak Bank UPI Payment Message : कोटक बँकेचा ग्राहकांना मोठा धक्का! आता UPI Payment नंतर येणार नाही बँकेचा मॅसेज

Kotak Bank New Rule : गुरूवारी 18 मे रोजी कोटक महेंद्रा बँकेकडून नवा नियम लागू करण्यात आला आहे.

कोमल दामुद्रे

Kotak Bank Discontinued UPI Payment SMS: जर आपले खाते कोटक महेंद्रा बँकेत आहे तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. गुरूवारी 18 मे रोजी कोटक महेंद्रा बँकेकडून नवा नियम लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार आता कोटक महेंद्रा बँकेच्या ग्राहकांना काही UPI ट्रांजेक्शनचे मेसेज येणार नसल्याचे कळवण्यात आले आहे.

त्यामुळे काही वेळा वेळा तांत्रिक अडचणींमुळे ट्रांजेक्शन फेल होते, त्यामुळे अशा वेळी ट्रांजेक्शनच्या मेसेजमुळे पेमेंट (Payment) झाल्याचे कळायचे परंतु आता या नियमामुळे पैसे पाठवले गेले आहेत की नाही हे कळणार नसल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. बँकेडून या नियमातील (Rules) बदला बद्दलची माहिती ग्राहकांना SMSच्या माध्यमातून देण्यात आली आहे. चला पाहुयात किती रक्कमेच्या UPI देवाण-घेवाणीवर ग्राहकांना मेसेज पाठवण्यात येणार नाही आणि ग्राहक याबद्दलची माहिती कुठून मिळवू शकतात.

1. कोणत्या ट्रांजेक्शनला येणार नाहीत SMS

गुरुवारी बँकेने (Bank) आपल्या ग्राहकांना 100 रुपयांपेक्षा कमी रक्कमेच्या ट्रांझेशनचा मेसेज येणार नसल्याची माहीती SMSच्या स्वरुपात दिली. तसेच, UPIने 500 किंवा त्यापेक्षा कमी रक्कम आपल्या खात्यात जमा झाल्यास त्याचाही मेसेज येणार नाही. बँकेने हा नियम 15 मे पासून तत्काळ लागू केला असून ग्राहकांना त्यांच्या बँक स्टेटमेंटमध्ये आपल्या एकूण उर्वरित रक्कमे बाबतची माहीती मिळणार आहे.

2. SMS मिळवण्यासाठी काय करावे?

जर तुम्हाला तुमच्या प्रत्येक ट्रांझेशनचा मेसेज हवा असेल तर SMS बँकिंगला आपल्या कोटक मोबाइल बँकिंगवरुन इनेबल करावे लागेल. त्यानंतर तुम्हला प्रत्येक ट्रांजेक्शनचा मेसेज पाठवला जाईल.

3. कोटक बँकेच्या अॅपवरुन UPI पेमेंट कसे करावे?

1. सर्व प्रथम आपले कोटक मोबाइल अॅप उघडा.

2. My Kotak किंवा बँकिंग सेक्शन वरील BHIM UPIवर क्लिक करा.

3. मॅनेज VPAवर क्लिक करून क्रिएट VPA वर क्लिक करा.

4. आपले खाते निवडा जे तुमच्या VPAला लिंक असेल.

5. आपला VPA प्रविष्ट करा.

6. आपला तपशील पाहून कन्फर्मवर क्लिक करा.

7. तुम्ही कोटकच्या मोबाइल बँकिंग अॅप वरून UPI वापरू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

President Droupadi Murmu: संविधान, लोकशाही....ऑपरेशन सिंदूर ते पहलगाम हल्ला; राष्ट्रपतींच्या संबोधनातील ठळक मुद्दे

Ladki Bahin Yojana : लाखो घरांमध्ये तीन लाडक्यांना लाभ, संभाजीनगरात तब्बल 84 हजार अर्ज; हजारो लाडकींचे अर्ज रडारवर

Shocking : कोचिंग क्लासमधील मुलीवर नराधमाची वाईट नजर; शिक्षक-विद्यार्थिनीचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, परिसरात खळबळ

Crime News : धक्कादायक! मुतखड्याचं ऑपरेशन, डॉक्टरांनी तरूण शेतकऱ्याची किडनीच गायब केली

मोठी बातमी! HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठीची मुदत पुन्हा वाढवली! शेवटचा दिवस कोणता?

SCROLL FOR NEXT