Lal Bahadur Shastri Jayanti Saam Tv
लाईफस्टाईल

Lal Bahadur Shastri Jayanti: देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बदाहूर शास्त्री यांच्याविषयी काही खास गोष्टी

Lal Bahadur Shastri: देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Lal Bahadur Shastri Interesting Story :

देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती. 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तरप्रदेशमध्ये त्यांचा जन्म झाला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. महात्मा गांधी यांच्यामुळे लाल बहादूर शास्त्री स्वातंत्र्यलढ्यात उतरले. मवाळ गटाचे ते महत्त्वाचे नेते होते.

'जय जवान जय किसान' हा नारा देत त्यांनी स्वातंत्र्य लढा दिला. पंडित जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असताना त्यांच्याकडे केंद्रिय मंत्रिमंडळात रेल्वे आणि गृह मंत्रालयाची जबाबदारी होती. जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर जून 1965 मध्ये लाल बहादूर शास्त्री देशाचे दुसरे पंतप्रधान झाले. 'हरित क्रांतीचे जनक' अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1. लाल बहादूर शास्त्रींचे मूळ आडनाव हे शास्त्री नसून श्रीवास्तव होते. त्यांचे नाव लाल बहादूर शास्त्री श्रीवास्तव असे होते. 1925 मध्ये वाराणसीतील काशी विद्यापीठात त्यांना 'शास्त्री' पदवीने गौरवण्यात आले. त्यानंतर त्यांनी हेच आडनाव लावले.

2. लाला लजपतराय यांनी स्थापन केलेल्या लोकसेवक मंडळाचे ते सदस्य होते. त्यांनी अनेक सामाजिक कामे केली.

3. देशाचे पंतप्रधान असताना 1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झाले. याकाळात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होता. त्या काळात त्यांनी स्वतः चे मानधन स्विकारले नाही.

4. भारत पाकिस्तान युद्धाच्या काळात अन्नधान्याचा तुटवडा अशा अनेक संकटाना तोंड देताना त्यांनी शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी 'जय जवान जय किसान'चा नारा दिला.

5. स्वातंत्र्यपूर्व काळात 1920 मध्ये त्यांनी गांधीजींच्या असहकार चळवळीत सहभाग घेतला. १९३० मध्ये मीठाच्या सत्याग्रहात अटक झाल्यानंतर त्यांनी २ वर्षांहून अधिक काळ तुरुगांत शिक्षा भोगली.

6. लाल बहादूर शास्त्रींनी आपल्या पगारातील मोठा वाटा गांधीवादी लोकांसाठी दान केला. त्यावेळी देशाचे पंतप्रधान असूनही त्यांनी शासकीय गोष्टींचा वापर करणे टाळले.

7. दिल्लीत लाल बदाहूर शास्त्रींचे समाधीस्थळ 'विजय घाट' म्हणून ओळखले जाते. हे स्मृतीस्थळ अनेकांसाठी प्रेरणा देणारे स्थान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात भाजपची त्सुनामी, 80 टक्के जागांवर फुलले कमळ, असा विजय कधीच मिळाला नाही

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यात कोणत्या मतदारसंघातून कोण विजयी? जाणून घ्या एका क्लिकवर

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT