Potassium Deficiency Saam Tv
लाईफस्टाईल

Potassium Deficiency : पोटॅशियमच्या कमतरतेमुळे हृदयावर होतो विपरीत परिणाम, आहारात आजच 'या' पदार्थांचे सेवन करा

हृदयाचे ठोके अचानक कमी-जास्त होत असेल तर हृदयविकरासारख्या गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते.

कोमल दामुद्रे

Potassium Deficiency : हृदयामधील होणाऱ्या अनियमित हालचालींमुळे विविध प्रकारचे आजार उद्भवतात. नियमित काळजी न घेतल्याने हे आजार आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरतात. हृदयाचे ठोके अचानक कमी-जास्त होत असेल तर हृदयविकरासारख्या गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते.

अशा पद्धतीचे आजार का व कधी उद्भवतात जाणून घेऊया. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार काही अंतर्गत गोष्टींशिवाय आपल्या आहारात कमी पडणाऱ्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हृदयामध्ये असामान्य हालचाली होऊ शकतात. पोटॅशियमची कमी होणे ही यातीलच एक समस्या आहे.

तुमच्या शरीरात पोटॅशियमची कमतरता असेल तर तुम्हाला अनेक आजारांना बळी पडावे लागेल. शरीरात पोटॅशियमचे योग्य प्रमाण नसल्यास तुमच्या हृदयावर त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो.

Potassium Deficiency

महत्त्वाचं म्हणजे पोटॅशियमची गरज महिलांना जास्त असते. त्यांच्या हाडांमधील पोटॅशियमचे प्रमाण योग्य नसेल तर महिलांना त्वचेचे आजार सुध्दा उद्भवू शकतात. एवढंच नाही तर पोटॅशियमच्या अनियमित प्रमाणामुळे हातापायांना मुंग्या येणे, अशक्तपणा येणे, उच्च रक्तदाब यांसारखे आजार झपाट्यानं वाढतात. तसेच वयस्कर व्यक्तींसाठी रोज 1600 ते 2000 मिली ग्रॅम एवढ्या मात्रामध्ये पोटॅशियमची गरज असते. अनेक प्रकारच्या भाज्या, फळं खाऊन पोटॅशियमचं प्रमाण योग्य राखल जाऊ शकत.

केळी, रताळे, नारळपाणी, किवी, संत्री, मोसंबी, टोमॅटो,गाजर,मशरूम यांसारख्या पदार्थांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे सगळ्यांनी नियमित या पदार्थांचे सेवन केलं पाहिजे. रताळ्यांमध्ये सर्वात जास्त पोटॅशियम कॅल्शियम असते. आहारामध्ये नियमीत या पदार्थाचे सेवन केल्यास तूम्ही हृदयविकारासारख्या होणाऱ्या गंभीर आजारांपासून आपला बचाव करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पात्र ITI विद्यार्थ्यांना SSC आणि HSSC समकक्ष मान्यता; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

MSRTC अखेर दरवाढ केलीच! मध्यरात्रीपासून नवे दर लागू; किती असेल मुंबई-पुण्यासाठी तिकीट

खोत डोंगरी पुनर्विकास प्रकल्पाचा वाद पेटला; न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवला, ऑफिस कंटेनर हटवला

सलमान खानचा SRA मध्ये जलवा! झोपडपट्टीधारकांना मिळालं हक्काचं घर

जयंत पाटलांना अर्थखातं मिळणार? फडणवीस-शिंदेंसोबत जयंत पाटलांची बैठक

SCROLL FOR NEXT