Kolhapuri Thecha Saam TV
लाईफस्टाईल

Kolhapuri Thecha : पदार्थाची चव वाढवण्यासाठी घरीच बनवा अस्सल कोल्हापूरी ठेचा; वाचा रेसिपी

Ruchika Jadhav

कोल्हापूरमधील विविध पदार्थ आणि खाद्य संस्कृती संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. अनेक व्यक्ती खास कोल्हापूरी चव चाखण्यासाठी थेट मुंबई किंवा पुण्याहून कोल्हापूरचं एखादं हॉटेल गाठतात. कोल्हापूरमध्ये नॉनव्हेजसह व्हेज पदार्थ देखील फार चविष्ट मिळतात. मग त्यात तांबडा पांढरा रस्सा आणि मिरचीच्या खरड्याची बातच न्यारी आहे.

अनेकदा घरी जेवणात डाळ भात किंवा एखादी भाजी कमी तिखट बनते. त्यामुळे जेवणाची चव वाढण्यासाठी ताटात खरडा वाढला की पदार्थ आणि टेस्टी लागतात. यामुळे आज घरच्या घरी कोल्हापूरी स्टाईल ठेचा किंवा खरडा बनवतात तरी कसा त्याची माहिती जाणून घेऊ.

साहित्य

हिरव्या तिखट मिरच्या

धने

जिरे

खोबरं

लसूण

शेंगदाणे

सफेद तीळ

तेल

मीठ

कृती

सर्वत्र आधी गॅसवर भाकरी करण्यासाठी तुम्ही जो तवा वापरता त्यावर शेंगदाणे भाजून घ्या. त्यानंतर सुक्क खोबरं बारीक कापून घ्या. हे खोबरं गॅसवर भाजून घ्या. खोबरं भाजत आलं की त्यामध्ये लसूण टाका. तसेच जिरे, धने आणि साफेद तीळ सुद्धा भाजून घ्या.

सर्व साहित्य भाजत असताना गॅस मिडीयम फ्लेमवर ठेवा. तर पुढे हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. तसेच नंतर हिरव्या मिरचा छान भाजून घ्या. हे सर्व मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. आता त्यांच्याकडे पाटा, वरवंटा असेल तर उत्तम. त्यावर आधी खोबरं ठेचून घ्या. नंतर सर्व मिरच्या आणि साहित्य वाटून घ्या. किंवा मग तुम्ही हे सर्व मिश्रण मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता.

वाटलेला हा ठेचा गॅसवर तवा ठेवा, त्यात थोडं तेल टाका आणि हे मिश्रण त्यात टाका. हे सर्व छान परतून घ्या. तयार झाला तुमचा हिरव्या मिरचीचा ठेचा. हा ठेचा तुम्ही कोणत्याही भाजीबरोबर खाऊ शकता.

ठेचामध्ये तुमच्या आवडीनुसार मीठ आणि हळद देखील मिक्स करा. जर घरी तुमच्या आवडीची भाजी नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही हा ठेचा खाऊ शकता. मिरच्यांचा ठेचा साधारण 8 दिवस तुम्ही स्टोर करून ठेवू शकता.

काही व्यक्ती जेवणाची चव वाढावी यासाठी विविध सॉस आणि शेजवान मसाले किंवा चटणी वापरतात. मात्र त्यापेक्षा तुम्ही अस्सल गावरान कोल्हापूरी ठेचा वापरला तर पदार्थाची चव फारच छान लागते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT