Manasvi Choudhary
महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये जेवणात तोंडी लावण्यासाठी विविध चवदार पदार्थ खाल्ले जातात.
ज्यामध्ये खोबऱ्याची चटणी, लसणाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, मिरचीचा ठेचा, लोणचं, कोशिंबीर आणि पापड असे विविध पदार्थ जेवणात खाल्ले जातात.
झणझणीत लसणाच्या पातीची चटणी जेवताना लोक आवडीने खातात.
लसूण चटणी बनवण्यासाठी २० ते २५ लसणाची पाती चिरून घ्या.
३ हिरव्या मिरच्या आणि दीड कप कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
लसणाची पात, हिरव्या मिरच्या, लसूण यांचे एकत्रित मिश्रण वाटून घ्या.
चवीनुसार मीठ घालून अर्धा लिंबू पिळून त्यात थोडी साखर घालावी. अशाप्रकारे तयार झालेल्या चटणीचा आस्वाद घ्या