Paleshwar Waterfall Saam TV
लाईफस्टाईल

Kolhapur Paleshwar Waterfall: पालेश्वर धबधब्याचे मंत्रमुग्ध करणारे दृश्य ड्रोन कॅमेरात कैद, पाहा व्हिडीओ

Kolhapur's Paleshwar Waterfall Drone View: कोल्हापूरमधील पालेश्वर धबधब्याचे मनमोहक दृश्य ड्रोन कॅमेरात कैद झाले आहे. या धबधब्याला पावसात भेट देण्यासाठी पर्यटक आकर्षित होत आहेत.

Shreya Maskar

पावसात निसर्गाचे सौंदर्य खुलून येते. या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक आवर्जून निसर्गरम्य ठिकाणांना भेट देतात. सध्या कोल्हापूरमधील पालेश्वर धबधब्याचा एक सुंदर व्हिडीओ समोर आला आहे. या धबधब्याने पर्यटकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारे हे सौंदर्य आहे.

महाराष्ट्रात अनेक धबधबे आहेत आणि पावसात यांच्या सौंदर्याला चार चाँद लागते. कोल्हापूर मधील पालेश्वर धबधब्याचा सुरेख नजारा ड्रोन कॅमेरात कैद झाला आहे. कोल्हापूर मधील शाहुवाडी तालुक्यातील पालेश्वर धबधबा सध्या पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. निसर्गाचा सुंदर देखावा पाहण्यासाठी लोक येथे आवर्जून येत आहेत. धरण भरल्यानंतर कमी उंचीवरून वाहणाऱ्या धबधब्याला पाहण्याचा अनुभव मनाला सुखावून जातो. निसर्गाचे अद्भूत रूप येथे पाहायला मिळत आहे. फेसाळलेल्या धबधब्याचे रूप पाहण्यासाठी पर्यटकांची पावले आपसूक धबधब्याकडे जात आहेत.

पश्चिम घाटात निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पालेश्वर धबधब्याचे ड्रोनद्वारे दृश्य कैद करण्यात आले आहे. धबधब्याच्या मनमोहक रूपाने तिथला निसर्ग उजळून निघाला आहे. मागील काही दिवसांपासून पालेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित होताना पाहायला मिळत आहे. धरण भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग जिथून होतो तिथून हा निसर्ग पाहण्याचा एक वेगळाच अनुभव आहे. पालेश्वर धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आतूर झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT