Monsoon Tips : अरे बापरे! ऐन पावसात छत्री तुटली; काय कराल?

Broken Umbrella Tips : ऐन पावसात छत्री तुटली किंवा रेनकोट फाटला तर 'या' टिप्स फॉलो करा.
Broken Umbrella Tips
Monsoon TipsSAAM TV
Keep raincoat along with umbrella in rain
Keep raincoat along with umbrella in rainYandex

पावसात छत्री सोबत रेनकोट ठेवा

पावसात कधीही छत्री सोबत रेनकोट ठेवावा. कारण मुसळधार पाऊस पडत असल्यास रेनकोट जास्त भिजण्यापासून आपल्याला वाचवतो.

Baggage care
Baggage careYandex

सामानाची काळजी

पावसात सामान घेऊन प्रवास करत असाल तर बॅगला कव्हर घालावे. त्यामुळे छत्री जरी तुटली असली तरी सामान सुरक्षित राहू शकते.

Umbrella-Raincoat care throughout the year
Umbrella-Raincoat care throughout the yearYandex

वर्षभर छत्री-रेनकोटची काळजी

ऐन पावसात छत्री तुटू नये किंवा रेनकोट फाटू नये म्हणून रेनकोट आणि छत्रीची वर्षभर विशेष काळजी घेतली पाहिजे.

Rust on the umbrella pole
Rust on the umbrella poleYandex

छत्रीच्या दांड्याला गंज

पावसातून आल्यावर छत्री किंवा रेनकोट पूर्णपणे सुकल्यावरच घडी करून ठेवावा. नाहीतर त्यांना वास येऊ शकतो. तसेच छत्रीच्या दांड्याला गंजही लागतो.

Umbrella quality
Umbrella qualityYandex

छत्रीचा दर्जा

सहसा जोरदार वादळी पावसामुळे छत्री तुटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पावसात छत्री खरेदी करताना छत्रीचा कापड आणि दांडा मजबूत आहे ना याची खात्री करावी.

summer umbrella
summer umbrella Yandex

उन्हाळ्यातही छत्रीचा वापर टाळा

पावसासोबत काही लोक उन्हाळ्यातही छत्रीचा वापर करतात. पण या दोन्ही छत्र्या वेगवेगळ्या असणे खूप गरजेचे आहे. उन्हाळ्यातील छत्री पावसात वापरल्यामुळे ती लवकर खराब होऊ शकते. कारण उन्हामुळे छत्रीचा कापड आधीच थोडा खराब झालेला असतो.

Umbrella separate bag
Umbrella separate bagYandex

छत्री स्वतंत्र बॅग

छत्री दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी छत्री स्वतंत्र बॅगमध्ये ठेवून द्या. छत्री धुताना कोमट पाण्याचा वापर करा.

Wash the raincoat with detergent water
Wash the raincoat with detergent waterYandex

डिटर्जंटच्या पाण्याने रेनकोट धुणे

पावसाळा संपल्यावर रेनकोट बांधून ठेवण्या अगोदर डिटर्जंटच्या पाण्याने स्वच्छ धुवून सुकवा.

Wipe with a raincoat cloth
Wipe with a raincoat clothYandex

रेनकोट कपड्याने पुसा

नियमित रेनकोट धुताना फक्त त्यावर पाणी ओतू नका तर स्वच्छ कपड्याने तो पुसून घ्या. यामुळे रेनकोटवर पडलेले डाग निघून जातील.

rain
rainYandex

पावसात तारांबळ उडणार नाही

छत्री - रेनकोटची अशाप्रकारे काळजी घेतल्यास ऐन पावसात ते खराब होणार नाही आणि तुमची तारांबळ उडणार नाही.

disclaimer
disclaimerYandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com