Dudhsagar Falls : चहुबाजूने घनदाट जंगल आणि मधोमध दूधासारखा वाहणारा दूधगंगा धबधबा; निसर्गाचं सौंदर्य पाहून भारावून जाल

Dudhsagar Waterfalls Goa Tourism : गोवा म्हटलं की समु्द्राच्या लाटा आणि जंगी पार्टी डोळ्यांसमोर उभी राहते. गोव्यातील विविध अकर्षक गोष्टी आणि ठिकाणांमधील आणखी एक प्रसिद्धा ठिकाण म्हणजे दूधसागर धबधबा.
Dudhsagar Waterfalls Goa Tourism
Dudhsagar FallsSaam TV

हनिमून असो किंवा पार्टी गोव्याला फिरायला जाण्याचा मोह सर्वांनाच होतो. तरुणांना येथे फिरण्याचं विशेष आकर्षन असतं. गोवा म्हटलं की समु्द्राच्या लाटा आणि जंगी पार्टी डोळ्यांसमोर उभी राहते. गोव्यातील विविध अकर्षक गोष्टी आणि ठिकाणांमधील आणखी एक प्रसिद्धा ठिकाण म्हणजे दूधसागर धबधबा.

Dudhsagar Waterfalls Goa Tourism
Bhambwali Vajrai Waterfall : साताऱ्याला डोळ्यांचं पारणं फेडणारा 'भांबवली' धबधबा पाहून भांबावून जाल

320 मीटर उंचावरून पाणी खाली कोसळतं

दूधसागर धबधबा इतका सुंदर आहे की, तब्बल ३२० मीटर उंचावरून येथे पाणी खाली कोसळतं. भारतातील सर्वात मोठ्या धबधब्यांमध्ये हा धबधबा पाचव्या क्रमांकावर येतो. गोव्यातील मांडोवी नदीवर हा विशाल धबधबा आहे. या धबधब्याच्या आकर्षनाचं प्रमुख कारण म्हणजे धबधबा जवळून पाहिल्यावर तो आपण पुन्हा पुन्हा पाहत आहोत असा भासतो.

दोन राज्यांच्या सिमेवर

दूधगंगा धबधबा गोवा आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमेवर आहे. पर्यटक येथे फक्त सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच जाऊ शकतात. या धबधब्याकडे जाताना संपूर्ण जंगलातून वाट काढावी लागते. घटनदाट जंगलातून येथे पोहचण्यासाठी येथे जीप उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून तुम्ही धबधब्यापर्यंत जाऊ शकता. हा धबधबा पणजीपासून तब्बल ६० रिलोमीटर अंतरावर आहे.

दूधसागर धबधबा हे नाव का पडलं?

धबधब्याच्या खाली एक तलावही सुद्धा आहे. धबधब्याचं नाव दूधसागर पडण्यामागे एक वेगळी कथा सुद्धा आहे. कथेमध्ये सांगण्यात आलं आहे की, येथे एक राजकुमारी रोज आंघोळ करायची. एक दिवस तलावात ती आंघोळ करत असताना एक तरुणाची नजर तिच्यावर पडली. त्यावेळी राजकुमारीच्या मैत्रिणीने धबधब्यावर दूध ओतून दिले.

दूध ओतल्यावर या धबधब्यातून राजकुमारी पुढे दिसत नाही. त्यामुळे या धबधब्याचं नाव दूधसागर ठेवण्यात आलं. आजही हा धबधबा दूधसागर या नावानेच ओळखला जातो. दूधसागर धबधब्याला भेट द्यायची असेल तर तुम्हाला आधी गोव्याला जावं लागेल. तेथून पुढे पणजी आणि मग जीपच्या सहाय्याने तुम्ही दूधगंगा धबधब्याजवळ पोहचाल.

Dudhsagar Waterfalls Goa Tourism
Maharashtra's Reverse Waterfall: उलट्या दिशेने वाहणारा धबधबा! महाराष्ट्रातील भन्नाट ठिकाण आहे तरी कुठे? वाचा कसं जायचं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com