Kojagiri Purnima Milk Saam TV
लाईफस्टाईल

Kojagiri Purnima Milk : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घरच्याघरी बनवा मसाला दूध; वाचा सिंपल आणि परफेक्ट रेसिपी

Kojagiri Purnima Milk Recipe : कोजागिरी पौर्णिमेसाठी दूध घरच्याघरी कसं बनवायचं याची रेसिपी आज जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

आज सर्वत्र कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जात आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रत्येकाच्या घरी मसाला दूध बनवलं जातं. हे मसाला दूध फार घट्ट असतं. याची चव अगदीच निराळी असते. मसाला दूध प्रत्येकाला आवडतं. रात्री चंद्राचे प्रतिबिंब पाहून मसाला दूध प्यायलं जातं. मात्र अनेक व्यक्तींना हे मसाला दूध परफेक्ट पद्धतीने बनवता येत नाही. त्यामुळे दूध बनवण्याची योग्य रेसिपी काय आहे याची माहिती जाणून घेऊ.

साहित्य

दूध - १ लिटर

दूध मसाला - १ डब्बी

ड्रायफ्रूट्स - १ वाटी

वेलची - १ चमचा

जायफळ - चिमुटभर

साखर - ५ चमचे

कृती

सर्वात आधी एका एका भांड्यात सर्व दूध जमा करा. तुम्ही घेत असलेलं दूध फूल फॅट मिल्क असावं. त्यासाठी सर्वात आधी दूध गॅसवर छान गरम करून घ्या. दुधाला पहिली उकळी येईपर्यंत गॅसवर गरम करत राहा. उकळी आल्यानंतर गॅस कमी करा. त्यानंतर या दुधात साखर मिक्स करा. साखर मिक्स केल्यावरती दुधात पूर्ण विरघळूद्या. त्यानंतर दुधात काजू, बदाम आणि अन्य ड्रायफ्रूट्स सुद्धा मिक्स करा.

विविध ड्रायफ्रूट्स मिक्स करताना त्यांची चव आणखी जास्त छान आणि रुचकर असावी यासाठी ड्रायफ्रूट्सचे बारीक काप करून घ्या. हे सर्व काप तुपात तळून घ्या. तुपात तळून झाले की ड्रायफ्रूट्स दुधात मिक्स करा. ड्रायफ्रूट्स दुधात मिक्स केल्यानंतर यात केसरच्या काड्या देखील मिक्स करा.

पुढे स्वाद छान यावा म्हणून यामध्ये वेलची आणि जायफळ सुद्धा मिक्स करा. वेलची आणि जायफळ चवीला मस्त लागतं. दुधात वेलची आणि जायफळ मिक्स केल्याने याचा स्वाद सर्वांना आवडतो. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी देखील तुम्ही कोजागिरीनिमित्त असं दूध बनवू शकता.

कोजागिरी पौर्णिमेला दुधासह तुम्हाला आणखी काही तिखट हवे असेल तर तुम्ही भजी खाऊ शकता. बेसन पिठात कांदा किंवा बटाट चिरून तुम्ही यापासून मस्त भजी बनवू शकता. भजी आणि कोजागिरी पौर्णिमेचं दूध हे कॉम्बीनेशन अनेकांचं फेवरेट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

SCROLL FOR NEXT