Besan Bhurji saam tv
लाईफस्टाईल

Besan Bhurji : गावाकडची झणझणीत बेसन भुर्जी; जाणून घ्या स्पेशल रेसिपी

special dish recipe: बदलत्या जीवनशैली तुमच्या पोटाच्या समस्या अधिक वाढल्या आहेत.

Saam Tv

सध्याच्या कामाच्या धावपळीत आपली जीवनशैली अगदी बदलून गेली आहे. आपली खाण्यापिण्याची पद्धतही बदलताना दिसते. हल्ली काही मंडळी डाएट करतात तर काही जण मोठ मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातात. यासगळ्यामुळे तुमच्या पोटाच्या समस्या अधिक वाढल्या आहेत. त्यात तुम्ही कामाच्या ठिकाणी किंवा मुलांच्या टिफीन बॉक्समध्ये रोज ठरलेले पदार्थ दिले की, ते बाहेरचे पदार्थ खाणे पसंत करतात. त्यासाठी एक खास आणि चटपटीत घरगुती डिश आम्ही तुमच्यासाठी आणली आहे. ती डिश म्हणजे बेसनाची भुर्जी.

बेसनाची भुर्जी तयार करण्याचे साहित्य

बेसन: १ वाटी

कांदा: १ मध्यम आकाराचा (बारीक चिरलेला)

टोमॅटो: १ मध्यम आकाराचा (बारीक चिरलेला)

हिरवी मिरची: १-२ (बारीक चिरलेली)

आले-लसूण पेस्ट: १/२ टीस्पून

धने पावडर: १/२ टीस्पून

हळद पावडर: 1/4 टीस्पून

लाल मिरची पावडर: 1/4 टीस्पून

जिरे: १/२ टीस्पून

हिरवी धणे: 2 चमचे (चिरलेला)

मीठ: चवीनुसार

तेल: 1-2 चमचे

पाणी: गरजेनुसार

बेसनाची भुर्जी बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम बेसन एका भांड्यात घेऊन त्यात थोडे पाणी अ‍ॅड करुन पातळ पिठ तयार करा. त्यात गुठळ्या नाहीत याची काळजी घ्या. आता कढईत तेल गरम करा, जिरे अ‍ॅड करा. जिरे तडतडायला लागल्यावर त्यात कांदा, आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची अ‍ॅड करुन, हलका सोनेरी होईपर्यंत परता. आता टोमॅटो अ‍ॅड करा. या भाज्या किंचित मऊ होईपर्यंत काही मिनिटे शिजवा.

मग त्यात मसाले मिक्स करुन परतुन घ्या. पुढे तयार केलेले बेसनाचे मिश्रण पॅनमध्ये मिक्स करा. हे मिश्रण सतत ढवळत राहा म्हणजे भुर्जीमध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत. भुर्जी मंद आचेवर शिजू द्या, जोपर्यंत ती कोरडी होत नाही आणि थोडीशी चुरगळे पर्यंत तिला परता. जर तुम्हाला कोरडी भुर्जी आवडत असेल तर ते थोडा जास्त वेळ शिजवा. तयार आहे तुमची गरमा गरम आणि चटपटीत बेसन भुर्जी रेसिपी.

Written By: Sakshi Jadhav

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

Dahi handi : एक गाव-एक दहीहंडी! पण फोडण्याची हटके पद्धत, इथे विहिरीत उडी मारून फोडली जाते दहीहंडी; Video

Maharashtra Live News Update: इंदापूरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, 17 हुन अधिक नागरिकांचा घेतला चावा

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; पुण्यात घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत शोककळा

Home Loan : होम लोन घेणाऱ्यांना जोरदार झटका! देशातील सर्वात मोठ्या बँकेनं वाढवले गृहकर्ज व्याजदर, EMI वाढणार

SCROLL FOR NEXT