Pickle Side Effects SAAM TV
लाईफस्टाईल

Pickle Side Effects : जेवताना तोंडी लावण्यासाठी वारंवार लोणचं खाताय? व्हा सावधान! नाहीतर वाढेल BP चा त्रास

Shreya Maskar

आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी लोणचे वारंवार खातो. पण दररोज जेवणासोबत लोणचं खात असाल तर वेळीच सावधगिरी बाळगा. कारण याचा तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. लोणच्यामध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते. जे तुमचे आरोग्य बिघडवण्यास मदत करते.

अतिप्रमाणात लोणचे खाण्याचे दुष्परिणाम

शरीराला सूज येते

वारंवार लोणचं खाल्ल्याने शरीराला सूज येते. लोणच्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्हज जास्त प्रमाणात असतात. जे लोणचं दीर्घकाळ टिकण्यासाठी मदत करतात. मात्र हे प्रिझर्व्हेटिव्हज शरीरासाठी घातक ठरतात. कारण यामुळे शरीरात युरिक अ‍ॅसिड तयार होते.

उच्च रक्तदाबाचा त्रास

घरी लोणचं बनवताना ते दीर्घकाळ ताजे रहावे यासाठी त्यात मीठ आणि तेलाचा वापर करतो. जास्त मीठ आरोग्यासाठी घातक ठरते. पण मोठ्या प्रमाणात मीठ पोटात गेल्यामुळे शरीरात सोडियमचे् प्रमाण वाढते. परिणामी उच्च रक्तदाबाचा त्रास वाढतो. तसेच किडनीचे आरोग्यही धोक्यात येते. ब्लड प्रेशरची समस्या असलेल्या लोकांनी लोणचे खाणे टाळा.

कोलेस्ट्रॉल वाढते

अति लोणच्याचे सेवन शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढवते. परिणामी आपले वजन वाढू लागते.

ॲसिडीटीचा त्रास

जेवताना सतत लोणचे खाल्ल्याने पोटात गॅसची समस्या निमार्ण होते. तसेच पचनक्रिया विस्कळीत होते. आंबट खाल्ल्याने पोटातील आम्लता वाढते. परिणामी पोट फुगणे, बद्धकोष्ठता, ॲसिडीटीचा त्रास उद्भवतो.

हाडे कमकुवत होतात

लोणच्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असल्याने हाडे आणि स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता भासते. जास्त आंबट खाणे सांधेदुखीची समस्या वाढवते.

जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा राजस्थानी लसूण चटणी

साहित्य

राजस्थानी लसूण चटणी बनवण्यासाठी लसूण, तिखट, धणे-जिरे पावडर, तेल, पाणी, तीळ,आमचूर पावडर, हळद, कोथिंबीर , साखर इत्यादी पदार्थ लागतात.

कृती

पारंपरिक पद्धतीने लसूण बारीक ठेचून घ्यावी. त्यानंतर एका भांड्यात तिखट, धणे, हळद, साखर टाकून सर्व एकजीव करून घ्यावे. आता एका पॅनमध्ये बारीक केलेली लसूण आणि मसाल्यांची पेस्ट टाकून तीळ आणि जिरे घालून फोडणी द्यावी. त्यानंतर वरून आमचूर पावडर, साखर, मीठ घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्या. शेवटी कोथिंबीर घालून लसूण चटणीचा भाकरीसोबत आस्वाद घ्या.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT