ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ओव्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.
रात्री झोपण्यापूर्वी ओव्याचे पाणी प्यायल्यास तुमची पचनक्रिया सुधारते.
झोपण्यापूर्वी ओव्याचे पाणी प्यायल्यामुळे शरीरातील चयाचाप वाढतो.
शरीरातील विषारी पदार्थ काढण्यासाठी झोपण्यापूर्वी ओव्याचे पाण्याचे सेवन करा.
ओव्यामध्ये शरीरासाठी उपयुक्त गुणधर्म आढळतात ज्याचे रात्री सेवन केल्यामुळे तणाव आणि चिंता कमी होते.
झोपण्यापूर्वी ओव्याचे पाणी प्यायल्यास डोकेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
झोपण्यापूर्वी ओव्याचे पाणी प्यायल्यामुळे शरीरातील अँटिऑक्सिडेंट्स आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.