Cold Milk Benefits Saam Tv
लाईफस्टाईल

Cold Milk Benefits : थंड दूध पिण्याचे आरोग्याला अनेक फायदे, जाणून घ्या

Milk Benefits : दुधामध्ये अनेक प्रकारचे न्यूट्रिएंट्स उपलब्ध असल्यामुळे आपल्या स्वास्थ्यासाठी दूध लाभदायक असते.

कोमल दामुद्रे

Health Tips : लहानांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांसाठी गाईचं आणि म्हशीचं दूध पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. दुधामध्ये अनेक प्रकारचे न्यूट्रिएंट्स उपलब्ध असल्यामुळे आपल्या स्वास्थ्यासाठी दूध लाभदायक असते.

यामध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम, विटामिन डी, कॅल्शियम, जिंक आणि पोटॅशियम ही सगळी तत्वे भरपूर प्रमाणात असतात. अनेक लोक जास्त करून गरम दूध पिणे पसंत करतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, थंड दूध पिण्याचे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया थंड दूध पिण्याचे फायदे.

थंड दूध पिण्याचे फायदे :

1.वजन कमी (Weight loss) करण्यासाठी फायदेशीर :

वजन कमी करण्यासाठी आपण हेवी एक्सरसाइज आणि कठीण डायट करतो. परंतु कितीही प्रयत्न केला तरीही आपले पोट काही कमी होत नाही. तर अशावेळी तुम्ही थंड दुधाचे सेवन करणे सुरू करा. दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते जे बेटा बोलिझमला दुरुस्त करण्यासाठी आणि बॉडी मधील कॅलरी बर्न करण्यासाठी मदत होते. याशिवाय तुम्ही थंड दूध पीत असाल तर तुम्हाला लवकर भूक लागत नाही, त्यामुळे वजन हळूहळू कमी होऊन जाते.

2. पोटात जळजळणे थांबेल :

जर तुम्हाला सतत पोटामध्ये जळजळ ऍसिडिटी अशा समस्या होत असतील तर, तुम्ही थंड दूध पिले पाहिजे. या हेल्दी ड्रिंकमुळे तुम्ही तुमची डायजेशन सिस्टम मजबूत बनवू शकता. जर तुम्हाला दुधाचा (Milk) आणखीन फायदा हवा असेल तर, दुधामध्ये इसबगोल मिसळवून प्या. त्यामुळे पोटाच्या समस्यांपासून आराम मिळेल.

Milk benefits

3. तुमची स्किन हेल्दी होईल :

कोल्ड (Cold) मिल्कमध्ये भरपूर प्रमाणात इलेक्ट्रॉलाइट्स उपलब्ध असतात. यामुळे तुमच्या शरीराला डीहायड्रेशनच्या समस्येला तोंड द्यावे लागत नाही. यामुळे तुमची स्कीन ग्लोविंग आणि शायनी बनते. आजकाल अनेक लोकांना त्वचेपासून होणारे आजारांना सामोरे जावे लागते. अशातच तुम्ही दररोज सकाळी उठल्यावर थंड दूध पिण्याची सवय लावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Facts: उपाशी राहिल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Horoscope Saturday Update : शत्रु त्यांचे काम करतील, तुम्ही तुमचे काम करा; आजचे राशीभविष्य

Indian Railway: रिल्स बनवणाऱ्यांनो ऐकलं का? रेल्वे स्टेशनवर रील बनवाल तर याद राखा, नेमकी काय कारवाई होणार?

अगं बाई! विदेशातही पोहोचला महाराष्ट्राचा ठसका! इटालियन महिलांनी गायले मराठी गाणं 'आता वाजले की बारा'

SCROLL FOR NEXT